मुंबईतील आठवा बळी

By admin | Published: June 20, 2017 01:29 AM2017-06-20T01:29:35+5:302017-06-20T01:29:35+5:30

मुंबई शहर-उपनगरात स्वाइन फ्लूचे सावट अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूत वाढ होत आहे.

Eighth victim of Mumbai | मुंबईतील आठवा बळी

मुंबईतील आठवा बळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर-उपनगरात स्वाइन फ्लूचे सावट अधिकच गडद होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबईत स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूत वाढ होत आहे. सोमवारी सकाळी नायर रुग्णालयात आणखी एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.
मालाड येथील मालवणी गेट क्र. ८ एमएचबी कॉलनी येथील शिफा सय्यद (३0) असे या मृत महिलेचे आहे. अनेक दिवसांपासून या महिलेला ताप होता. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार करून प्रकृतीत सुधारणा न झाल्याने, तिला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत खूपच खालावल्याने डॉक्टरांच्या उपचारादरम्यान तिचा
मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे.
याविषयी, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, वैद्यकीय अहवाल पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांना पाठविण्यात आला आहे. मात्र, या विषयी डॉ. खेतरपाल यांना विचारले असता, माहिती देण्यास नकार देऊन, आठवड्याच्या अहवालात ही माहिती स्पष्ट होईल, असे सांगितले.


१५ जूनपर्यंत राज्यात स्वाइन फ्लूचे २४० बळी गेले असून, मुंबईत ७ बळी गेले आहेत. २०१५ मध्ये स्वाइन फ्लूचे ३,०२९ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३०हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. २०१६ मध्ये स्वाइन फ्लूचे केवळ तीनच रुग्ण सापडले होते. २०१७ मध्ये सुरुवातीला स्वाइन फ्लूचे रुग्ण दिसून आले. २०१७ मध्ये मुंबईत आतापर्यंत १७७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई शहर-उपनगरातील ई, जी/नॉर्थ, के/ईस्ट, के/वेस्ट, एम/ईस्ट, एस आणि टी या पालिकेच्या विभागात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले.

Web Title: Eighth victim of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.