एनसीबीच्या ताब्यातील एजाज खानला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:06 AM2021-04-06T04:06:33+5:302021-04-06T04:06:33+5:30
चौकशी अधिकारी गेले विलिनीकरणात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अटकेत असलेल्या ...
चौकशी अधिकारी गेले विलिनीकरणात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अटकेत असलेल्या अभिनेता एजाज खानला कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी सकाळी त्याला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्याकडे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही विलगीकरणात ठेवले आहे. त्यांची तपासणी करण्यात आली असून, अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास तपासात मोठा खंड पडणार आहे.
एजाज खानचे ड्रग्ज माफिया फारूख बटाटा, त्याचा मुलगा शादाब याच्याशी अमली पदार्थ विक्री आणि सेवन व्यवहारात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या मंगळवारी त्याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित याच्या घरी छापा टाकला होता. यावेळी चौकशीदरम्यान एजाजची प्रकृती बिघडल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एनसीबीच्या कस्टडीतून त्याची रवानगी रुग्णालयात करण्यात आली आहे.