ठाणे : लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या १८ खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावर जाऊन श्री एकवीरा देवीची पूजा, आरती केली. या वेळी रश्मी ठाकरे यांनी देवीची ओटी भरली. शिवसेनेचे खासदार अनंत गीते (रायगड), प्रतापराव जाधव (बुलडाणा), आनंदराव अडसूळ (अमरावती), भावना गवळी (यवतमाळ-वाशीम), संजय जाधव (परभणी), चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), हेमंत गोडसे (नाशिक), विनायक राऊत (रत्नागिरी), गजानन कीर्तिकर, राहुल शेवाळे, अरविंद सावंत (मुंबई), श्रीकांत शिंदे (कल्याण), राजन विचारे (ठाणे), श्रीरंग बारणे (मावळ), शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर), सदाशिव लोखंडे (शिर्डी), रवींद्र गायकवाड (धाराशिव) यांनी श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले. शिवशाहीचे १९९५ला सरकार आले तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ, आमदारांना घेऊन श्री एकवीरेच्या दर्शनाला आल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १८ खासदारांना देवीच्या दर्शनाला घेऊन आले, ही एकवीरा देवीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण नोंद होणारी घटना असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे म्हणाले. याप्रसंगी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने तरे यांच्या नियोजनाखाली विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष मदन भोई, सेक्रेटरी संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, सहखजिनदार विलास कुटे, विश्वस्त सल्लागार काळुराम देशमुख, विजय देशमुख, पार्वती पडवळ आदींनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र कोळी समाज संघाचे ठाणे शहर संघटक योगेश कोळी, कल्याण संघटक दीपक भोईर, माहुल विभाग संघटक चारुदत्त कोळी, महागिरी संघटक रूपेश भोईर, धनंजय म्हात्रे, धनंजय कोळी, दिलीप जयसिंगपुरे, सुनील भोईर आदी उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने गडावर घेऊन जाणार्या व २० जणांना खाली घेऊन येणार्या लिफ्टची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले़ (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुखांसह १८ खासदारांचे एकवीरा देवीचे दर्शन
By admin | Published: May 25, 2014 2:09 AM