राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना ठाण्यात शरद पवार आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार हेही उपस्थित होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी खडसेंबाबत डोळ्या उंचावणारे वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे एबी फॉर्म घेऊन खडसेंच्या गावी म्हणजे जळगावकडे गेल्याची चर्चा सुरू होती. याबाबत, मला माहिती नसल्याचे पवार यांनी म्हटले.
पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, एकनाथ खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे भाजपशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे खरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे यांना भाजपाकडून तिकीट मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे खडसे म्हणाले, आपण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, आपण नेहमी पक्षाच्या आदेशाचं पालन करणारे कार्यकर्ते राहिलो आहोत. पक्षाच्या आदेशानं मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेले 30 वर्षे तुम्ही मला निवडून देताय.
एखादा विषय आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षानं सांगितलं तुम्हाला तिकीट देणार नाही. तुम्ही सांगाल त्याला तिकीट देऊ. तेव्हा मी विचारलं, मी का नको याचं उत्तर दिल्यास माझं समाधान होईल. माझे सर्वच कार्यकर्ते खडसे आहेत, असंही पक्षाला कळवल्याच खडसेंनी म्हटलं. त्यानंतर मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले. शरद पवार यांनी केलेला दावा खोटा असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी सोबत तीन महिनेच कय तर तीन वर्षांपासून संपर्कात राहिलेलो नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? या चर्चांना एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम दिलेला आहे. एकनाथ खडसे यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.