Join us

ईडीकडून एकनाथ खडसेंची सुमारे साडे सहा तास चौकशी, बाहेर येताच केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 6:59 PM

Eknath Khadse News : आज सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर सुमारे साडे सहा तास त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची आज ईडीने सुमारे साडे सहा तास चौकशी केली. आज सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर सुमारे साडे सहा तास त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर एकनाथ खडसे यांनी ईडीला चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे तसेच ईडीला जी कागदपत्रे लागतील ती देणार असल्याचे सांगितले.

 एकनाथ खडसे यांना ईडीने ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले होते. पण त्याच काळात कोरोनाची लक्षणे दिसल्याने एकनाथ खडसे क्वारेंटाइन झाले होते.  त्यामुळे खडसे यांना १४ दिवसांनंतर चौकशीस बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीने बजाविले. त्यानुसार आज सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.  आज एकनाथ खडसे यांच्या चौकशीदरम्यान, खडसेंच्या कन्येचीही चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, सकाळी चौकशीहून निघताना खडसे यांनी आजारपणामुळे आपल्याला थोडा अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले होते.  

टॅग्स :एकनाथ खडसेअंमलबजावणी संचालनालयराजकारणमुंबईजळगाव