Join us  

आनंद दिघे गेले तेव्हा विचारपूस नव्हे, त्यांची प्रॉपर्टी किती हे विचारलं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 10:05 PM

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

मुंबई-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बीकेसीत आयोजित दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. बंडखोरांना आज आनंद दिघेंची आठवण झाली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी आज केली. त्याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ज्यावेळी आनंद दिघे गेले तेव्हा मला तुम्ही पहिला प्रश्न त्यांची प्रॉपर्टी किती आणि ती कुणाकुणाच्या नावावर आहे हे विचारलंत, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 

...तर त्याला हार्टअटॅक आला असता, एकनाथ शिंदेंनी सांगितला उद्धव ठाकरेंसोबतचा 'तो' प्रसंग!

"दिघे साहेब जेव्हा गेले तेव्हा मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही दिघे साहेबांनी काय केलं? त्यांनी कसा पक्ष वाढवला? आता ठाण्यात पक्ष कसा वाढवता येईल? असं तुम्ही मला विचाराल असं वाटलं होतं. पण तुमचा पहिला प्रश्न आनंद दिघेंची प्रॉपर्टी किती आहे आणि कुणाकुणाच्या नावावर आहे ते तुम्ही विचारलंत. हे ऐकून मला धक्काच बसला होता. बाळासाहेबांची शपथ घेऊन मी हे सांगतो. आजवर मी हे बोललो नाही. मी खोटं बोलून सहानुभूती मिळवणारा नाही. आनंद दिघेंचं साधं बँकेत खातंही नव्हतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "आनंद दिघे म्हणायचे एक दिवस ठाण्याचा मुख्यमंत्री बनवणार. तुम्ही दिघेंचेही पाय कापलेत. रामदास कदम बरोबर बोलले", असंही शिंदे म्हणाले. 

"एकीकडे पक्ष आहे अध्यक्ष नाही; दुसरीकडे अध्यक्ष आहे पण पक्षच नाही"

कटप्पा प्रामाणिक होता, पण तुम्ही तर दुटप्पाउद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना 'बाहुबली'तील कपट्टाची उपमा दिली. त्यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. "आम्ही कटप्पा असू तर तो कटप्पापण प्रामाणिक होता. तुम्ही तर दुटप्पा निघालात. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही पक्ष वाढीसाठी काय केलं? कुणाला कधी चापट तरी मारलीय का? तुम्हाला कोथळा काढण्याची भाषा शोभत नाही. इथं एकनाथ शिंदेंच्या अंगावर १०० केसेसे आहेत. त्या काय चोरीच्या केसेस नाहीत. माझ्या नातवावर टीका करता. काय वेळ आली तुमच्यावर. माझ्या दीड वर्षांच्या नातवाचा काय दोष?, खरंतर रुद्रांशच्या जन्मानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. दीड वर्षाच्या बाळावर कसली टीका करता", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना