Join us  

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि बंडखोर गटाचा नवा पक्ष ‘बाळसेना’?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 7:43 AM

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय पटलावर भविष्यातील अंदाजाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढत असल्याने आणि कोणती तडजोडीची शक्यता तूर्त दिसत नसल्याने हा संघर्ष पेटणार हे जवळपास स्पष्ट आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या अस्थिर राजकीय पटलावर भविष्यातील अंदाजाचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा वाढत असल्याने आणि कोणती तडजोडीची शक्यता तूर्त दिसत नसल्याने हा संघर्ष पेटणार हे जवळपास स्पष्ट आहे. काही जाणकारांच्या मते शिंदे यांच्या पाठीशी असलेले आमदार आणि त्यांचे समर्थक नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना हा शब्द सातत्याने वापरल्याने तसेच बाळासाहेबांविषयी आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'बाळसेना' अशा नावाने स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम्हीच कट्टर शिवसैनिक दाखविण्याचा प्रयत्नही या मार्गाने केला जाईल, अशी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज आहे. याबाबतची स्पष्टता येत्या काही दिवसात होईलच.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनामहाराष्ट्रराजकारण