Join us

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंनी मौन सोडलं; टीकाकारांना वेडं म्हटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 2:04 PM

या चर्चेनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, ते गावी गेले असे शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. 

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांचं आजारपण हे खरं आजारपण नसून केवळ मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी व्यथित होऊन आलेलं आजारपण असल्याचं शिवसेनेनं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांचे आजारपण हे अजित पवारांच्या सत्तेत आल्याने झालेलं दु:खणं असल्याचं शिवसेना उबाठा गटाने म्हटलं आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, टीकाकरांना सत्ता गेल्यामुळे वेड लागलंय, त्यांना काहीही सूचत नाही, म्हणून ते अशी विधानं करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

सत्ता गेल्यामुळे ज्यांना काही सूचत नाही ते अशी विधान करत आहेत. सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार...असं ते म्हणतात. पण, सरकार पडता पडता म्हणणारे पाहतायंत, हे सरकार मजबूत होत चाललंय. सत्ता गेल्यामुळे  ज्यांना वेड लागलंय त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं.  पुण्यात राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमित शहा यांची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाल्याचं शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटलं आहे. दरम्यान, शिवसेना उबाठा गटासह विरोधी काँग्रेस नेत्यांकडूनही अशाच चर्चा होत आहते. या चर्चेनंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले, ते गावी गेले असे शिवसेनेनं म्हटलं होतं. शिवसेनेच्या या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. 

बच्चू कडूंनीही दिलं होतं स्पष्टीकरण

मुख्यमंत्र्यांच्या आजारपणासंदर्भातील टीकेवर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी कडक शब्दात भूमिका मांडली. ते बिलकुल खोटं आहे, आम्ही त्यांच्या भेटीला गेलो असता त्यांचा ताप १०३ पर्यंत गेला होता. सातत्याने काम करत असल्याने धावपळ आणि दगदगीतून हे आजारपण आलं असावं. नेतृत्त्व बदलासाठी आजारपण घेण्याची गरज नाही, असे आमदार कडू यांनी स्पष्ट केले. तसेच, मला ठाम विश्वास आहे, २०२४ पर्यंत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आणि जर तो बदल झाला तर महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच कडू यांनी दिला आहे. सत्तेतील भाजपा आणि राष्ट्रवादीलाच हा इशारा दिलाय. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनासंजय राऊतउद्धव ठाकरे