Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, PM मोदींची भेट अन् मंत्रिमंडळावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:32 PM2022-07-07T22:32:07+5:302022-07-07T22:34:09+5:30

Eknath Shinde: मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला (Delhi) जाणार आहेत

Eknath Shinde: Chief Minister Eknath Shinde leaves for Delhi, PM Modi meets and discusses cabinet | Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, PM मोदींची भेट अन् मंत्रिमंडळावर चर्चा

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, PM मोदींची भेट अन् मंत्रिमंडळावर चर्चा

googlenewsNext

मुंबई - बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर, इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. नागपुरात, फडणवीसांच्या स्वागताला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आता, शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. 

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला (Delhi) जाणार आहेत. उद्या शुक्रवारी (8 जुलै) रोजी भेट होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या भेटीत मुख्यत्वे चर्चा होणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे उद्या 8 जुलैला रात्री 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने पाठिंबा दिला म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत.

दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिल्या टप्प्याचा विस्तार हा आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) आधी होणार आहे. याचाच अर्थ येत्या 10 जुलैच्या आधी शिंदे सरकारच्या (Shinde Government) पहिल्या टप्प्प्याच्या विस्तारातील 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू, अशी घोषणा फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केली होती. तत्पूर्वीच, आता मोदी-शिंदेंची पहिली औपचारीक भेट होत आहे.

Web Title: Eknath Shinde: Chief Minister Eknath Shinde leaves for Delhi, PM Modi meets and discusses cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.