Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला; शिवसैनिक भरडल्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:12 AM2022-06-23T08:12:05+5:302022-06-23T08:12:48+5:30

Eknath Shinde: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या १८ मिनिटांच्या जाहीर संवादातून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना चर्चेचे आवाहन केले. त्याला अवघ्या दोन ट्विटमधील चार ओळीत उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला.

Eknath Shinde: CM's proposal rejected; Sadness of Shiv Sainiks | Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला; शिवसैनिक भरडल्याची खंत

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळला; शिवसैनिक भरडल्याची खंत

Next

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या १८ मिनिटांच्या जाहीर संवादातून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना चर्चेचे आवाहन केले. त्याला अवघ्या दोन ट्विटमधील चार ओळीत उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून लावला. अडीच वर्षांत शिवसैनिक भरडला गेला. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, शिवसेनेचे मात्र पद्धतीशीरपणे खच्चीकरण होत आहे. पक्ष  व शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे; असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 
भरत गोगावले नवे प्रतोद
३१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हेच पक्षाचे गटनेते असतील, असा ठराव बंडखोर आमदारांनी संमत केला आहे. तसेच पक्षाचे विधिमंडळ प्रतोद म्हणून आ. भरत गोगावले यांची नियुक्ती केली. सुनील प्रभू यांना प्रतोद पदावरून हटविण्यात येत असल्याचे पत्रप्रस्तावात म्हटले आहे.

बंडखोर ३४ आमदारांचा घरचा अहेर
nएकनाथ शिंदे व समर्थक आमदारांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व विधानभवन सचिव यांना सात पानी प्रस्तावाची प्रत पाठवली.  या पत्रावर शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, बच्चू कडू, यामिनी जाधव, श्रीनिवास वनगा, संदिपान भुमरे, तानाजी सावंत यांच्यासह ३४ आमदारांच्या सह्या आहेत.
nराज्यातील सत्ता मिळविण्यासाठी पक्षनेतृत्वाने हिंदुत्वाशी तडजोड केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या वैचारिक विरोधकांशी हातमिळवणी केल्याने वैचारिक पराभव झाला आहे. या दोन्ही पक्षांनी शिवसेनेचा पाया खिळखिळा करण्यासाठी सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे.
nमराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागत आहे. आमचा पक्ष आणि आमच्या पक्षप्रमुखांनी गेल्या वर्षात प्रचंड वैचारिक तडजोड केली. मविआ सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिकांमध्ये आणि लोकांमध्ये मोठा रोष आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याला तडा गेल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

पत्रातील इतर मुद्दे
नवाब मलिक तुरुंगात असल्याने सरकारची प्रतिमा खराब होत आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसैनिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. 
- मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला तत्त्वांशी तडजोड करावी लागत असल्याचा दावा प्रस्तावात केला आहे.
सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवसैनिक व लोकांत मोठा रोष आहे.

Web Title: Eknath Shinde: CM's proposal rejected; Sadness of Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.