Join us  

Eknath Shinde Dasara Melava: '50 आमदार-18 खासदार, जनतेने आम्हाला पाठिंबा का दिला? याचे आत्मपरीक्षण करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 9:10 PM

Eknath Shinde Dasara Melava:'शिवसेना तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, शिवसेनेला कोणाच्याही दावणीला बांधू देणार नाही.'

Eknath Shinde Dasara Melava: आज महाराष्ट्रात दसरा मेळाव्याचीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज दादर आणि बीकेसीत वाक् युद्ध पाहायला मिळाले. दसरा मेळाव्यातून दोन्ही गट एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. 'वंदनीय बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व तुम्ही गुंडाळून टाकले, त्यामुळेच आम्ही ही भूमिका घेतली,' असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

'सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

'अडीच वर्षे अन्याय सहन केला, पण...'यावेळी बोलताना ते म्हणतात की, '2019मध्ये तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात होता, सरकार बनवत होता, तेव्हा अनेक आमदार माझ्याकडे आले. ही आघाडी चुकीची आहे, ही आघाडी खड्यात नेणारी आहे, राज्याला अदोगदीकडे नेणारी आहे, असे आमदार म्हणू लागले. पण आम्ही आदेश माणणारे शिवसैनिक आहोत. तुमच्या आदेशाचे पालन केले. अडीच वर्षे अन्याय सहन केला, पण बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व तुम्ही गुंडाळून टाकले, त्यामुळेच आम्ही ही भूमिका घेतली.' 

'आम्हाला गद्दार बोलण्यापेक्षा आत्मपरीक्ष करा'ते पुढे म्हणाले, 'हे आमदार फक्त मलाचा भेटायचे, कारण तुम्ही भेटत नव्हता. मी त्यांना सांगितले की, आपल्याला ही चूक दुरुस्त करावी लागेल. हीच राज्यातल्या जनतेची इच्छा आहे. सरकारचे प्रमुख तुम्ही होता पण, राष्ट्रवादीच्या पडलेल्या नेत्यांना निधी मिळत होता, ताकत मिळत होती. आम्हाला 10-20 कोटी आणि त्यांना शंभर-दोनशे कोटी निधी मिळायचा. हा अन्याय आम्ही अडीच वर्षे सहन केला. त्यानंतरच ही भूमिका घेतली. आणि म्हणूनच 50 आमदार आणि 18 खासदारांनी, देशातील 14 राज्य प्रमुखांनी, शेकडो पदाधिकारी, हजारो समर्थकांनी मला का पाठिंबा दिला. यांनी आम्हाला का पाठिंबा दिला, याचा तुम्ही विचार केला का? आम्हाला गद्दार बोलण्यापेक्षा याचे आत्मपरीक्ष करा. 

बापाचे विचार विकले, मग तुम्हाला बाप विकणारी टोळी म्हणायचं का?; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

'ही गद्दारी नाही तर क्रांती आहे''राज ठाकरे, नारायण राणे, किती लोकं गेली, इथे निहार बसलाय...आम्ही सगळे चुकीचे आणि तुम्ही एकटे बरोबर. ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेनेला कोणाच्याही दावणीला बांधू देणार नाही. स्वतः आधी आत्मपरीक्षण कधी करणार. घरात बसून फक्त आदेश दिले. आम्हाला जो निर्णय घ्यावा लागला, तो आम्ही आनंदाने घेतला असे नाही. आम्हालाही वेदना झाल्या. गेल्या अडीच वर्षांची जी खदखद होती, तिचा उद्रेक होणारच. म्हणून तीन महिन्यंपूर्वी जूनमध्ये त्याचा उद्रेक झाला. त्याची दखल राज्याने नाही तर देशाने घेतली. हे परीवर्तन, हा उठाव, ही क्रांती होती,' असेही शिंदे म्हणाले.

'सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडले...'ते पुढे म्हणतात, 'या महाराष्ट्राला अन्यायातून मुक्त करण्यासाठी धाडसं लागतो, येड्यागबाळ्यांचे काम नाही. एकनाथ शिंदे जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला जीवाची पर्वा नाही. वेडे लोकंच इतिहास घडवतात. तुम्ही म्हणताय राजीनामा देऊन भाजपसोबत जा. 2019 मध्ये तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना राजीनामा दिला होता का. तुम्ही अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात गेलात. तुमचा कारभार कोणालाही आवडत नव्हता. कोरोना-कोरोना म्हणून सगळं बंद केले, तुमची दुकाने मात्र सुरू होती. बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है असा नारा दिला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडले. विचारांची कास तुम्ही सोडली,' असा हल्लाबोलही त्यांनी केला.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना