'समृद्धी' महामार्गात गैरव्यवहार, फडणवीसांवरील आरोप एकनाथ शिंदेंनीच फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:14 PM2020-02-25T13:14:55+5:302020-02-25T13:16:03+5:30
पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचं
मुंबई - विधिमंडळाच्या अधिवेशाचा दुसराही दिवसही विरोधकांनी शेतकरी मुद्द्यावरुन चांगलाच गाजवला. शेतकरी आणि महिला अत्याचारांच्या घटनांवरून विधानसभेचं कामकाज सुरु होताच भाजपने जोरदार घोषणाबाजी सुरु केली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर सुनील केदार यांनी नागपूरमध्ये काय झालं त्यावर बोलायचं का असा सवाल फडणवीसांना केला. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाच्या जमिन खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. समृद्धी महामार्गात घोटाळा झाल्याचं त्यांनी सभागृहात म्हटलं. समृद्धी महामार्गसाठी स्टेट बँकेकडून 4 हजार कोटी कर्ज घेतलं होतं. खुल्या बाजारात 7:3 टक्के दराने कर्ज मिळत असताना बँकेला 9:74 दक्के व्याज देण्यात येतं आहे. हा मोठा घोटाळा आहे. सरकारने त्याची चौकशी करावी. मात्र, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंनी हा घोटाळ्याचा आरोप अप्रत्यक्षपणे फेटाळला आहे. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलंय. फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचं काम एकनाश शिंदे यांच्या मंत्रालयाकडेच होते. त्यामुळे शिंदेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.