शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:58 PM2022-06-30T15:58:09+5:302022-06-30T16:00:08+5:30

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर तर उपमुख्यमत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार आहे.

Eknath Shinde-Fadnavis in the same train, from Aditya Thackeray's Worli constituency to Raj Bhavan | शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर

शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर

Next


मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर, बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. 

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर तर उपमुख्यमत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार आहे. दोघांच्याही शपथविधीचा मुहुर्त ठरला असून आज म्हणजेच गुरूवारी संध्याकाळी 7.00 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे. मात्र, केवळ दोघांचाच शपथविधी होणार असल्याचे समजते. त्यासाठी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनला पोहोचले आहेत. 

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील हे एकाच गाडीतून राजभवनकडे रवाना झाले आहेत. यावेळी, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या बाजुलाच बसले होते. तत्पूर्वी सागर बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यावेळी पुष्पगुच्छ देऊ एकनाथ शिंदेंचं भाजप नेत्यांनी स्वागत केलं. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही हातात हात देऊन अभिनंदन केले. त्यानंतर, चर्चा होताच हे तिन्ही नेते राजभवनकडे रवाना झाले आहेत. 

विशेष म्हणजे या तिन्ही नेत्यांच्या ताफा राजभवनकडे वरळी मतदारसंघातूनच गेला. आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ असून त्यांनी बंडखोर आमदारांना इशाराही दिला होता. त्यामुळे, या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. 

आदित्य ठाकरेंनी दिला होता इशारा

शिवसेनेतील बंडखोर नेत्यांच्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ज्या नेत्यांनी बंडखोरी केली त्यांना शिवसेनेने काय नाही दिले? भाजपाची महानगरपालिकेवर नजर आहे. मात्र, विधानसभेचा रस्ता वरळीतूनच जातो. बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला वरळीची गरज पडते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच, मी पर्यटनमंत्री असल्याने राज्यातून घाण गेली हेच माझे काम असल्याची टिकाही आदित्य ठाकरेंनी केली होती. 

Web Title: Eknath Shinde-Fadnavis in the same train, from Aditya Thackeray's Worli constituency to Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.