मुंबई - राज्यात शिवसेनेत आश्चर्यकारक बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना १०० दिवस तुरुंगात जावे लागले. तुरुंगातून बाहेर येताच खासदार राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करयाला सुरुवात केली आहे. एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा उघडून टाकू, असे टाकू ते पुन्हा उभेच राहणार नाहीत, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकेचे बाण मारले.
संजय राऊत यांना येथील मुलाखतीत चित्रपटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर चित्रपट बनवला, आता पुढचा एकनाथ शिंदेंवर बनवणार का?. त्यावर, संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना टोला लगावला. एकनाथ शिंदें त्यासाठी लायक नाहीत, ते एवढे मोठे नाहीत, त्यांच्यावर चित्रपट बनवावा. पण, यापुढचा चित्रपट मी कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यावर बनवणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. जॉर्ज यांचं व्यक्तीमत्त्व आणि कार्य आम्ही स्वत: पाहिलंय. मात्र, नव्या पिढीला ते कळायला हवं, त्यासाठी मी जॉर्ज यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता आणखी एका नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची संजय राऊत निर्मिती करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे. ते म्हणजे कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस.