Eknath Shinde: शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:19 PM2022-10-05T15:19:46+5:302022-10-05T15:22:45+5:30

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुंबईत आज दोन दसरा मेळावा होत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Eknath Shinde on top india twitter trend dussehra melava bkc | Eknath Shinde: शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

Eknath Shinde: शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

googlenewsNext

मुंबई-

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुंबईत आज दोन दसरा मेळावा होत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानही सज्ज झालं आहे. दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गर्दीची स्पर्धा दोन्ही गटाकडून सुरू झाली आहे. आता कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी जमतेय हे रात्री सभेवेळी कळेल. पण त्याआधीच्या एका लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरचढ ठरले आहेत असं दिसून येत आहे. 

सीएसएमटीला दोन ट्रेन आल्या! शिवसैनिकांचा एक गट शिवतिर्थावर, दुसरा बीकेसीकडे चालत निघाला

दसरा मेळावा संध्याकाळी होणार असला तरी ट्विटरवर आज सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टॉप ट्रेंडमध्ये आले आहेत. ट्विटरच्या इंडिया ट्रेंडमध्ये एकनाथ शिंदे हे टॉप ट्रेंडमध्ये आहेत. तर वांद्रे असा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत असल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय #ShivsenaAtBKC, #चला_BKC हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत. 

शिंदे-ठाकरे गटाची जोरदार तयारी
राजकीय पटलावर आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील दादर, सीएसएमटी स्टेशनवर राज्यभरातून बसेस, वाहने आणि रेल्वे येऊ लागल्या आहेत. सीएसएमटीवर काही वेळापूर्वी २४ डब्यांच्या दोन ट्रेन दाखल झाल्या. यातून दोन्ही गटाचे सुमारे ५००० कार्यकर्ते बाहेर पडले. दोन्ही गटांचे आमदार आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात होणार असल्याने त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना थेट पायी बीकेसीतील मैदान गाठण्यास लावले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील पायीच दादरच्या शिवाजीपार्ककडे रवाना झाले आहेत. 

'आजपर्यंत मुंबईत वाजला नाही, असा डिजे हिंगोलीतून आणलाय'; बांगरांचा आवाज

शिंदेंच्या मेळाव्यात दोन खासदार, ४ आमदारांचा प्रवेश?
शिंदे गटाच्या मेळाव्यात आज दोन खासदार आणि पाच आमदार प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.  यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी हा मोठा दावा केला आहे. शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीत शिवसेनेतील ५ आमदार आणि २ खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, असं कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Eknath Shinde on top india twitter trend dussehra melava bkc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.