एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांवर मात

By admin | Published: November 19, 2014 12:32 AM2014-11-19T00:32:55+5:302014-11-19T00:32:55+5:30

या दोनही महत्वाच्या घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी करणे व सहाय्य घोषीत करणे अपेक्षित होते. परंतु ते ना त्यांनी स्वत: केले ना त्यांच्या कुठल्या मंत्र्यांनी केले.

Eknath Shinde overcomes Chief Minister | एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांवर मात

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांवर मात

Next

ठाणे : विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळाची तातडीने पाहणी करून व चोरांच्या हल्ल्यात बळी पडलेले पोलीस गावंड यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन व २ लाखांची मदत जाहिर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारवर मात केली आहे.
या दोनही महत्वाच्या घटनांमध्ये मुख्यमंत्र्यांनी पाहणी करणे व सहाय्य घोषीत करणे अपेक्षित होते. परंतु ते ना त्यांनी स्वत: केले ना त्यांच्या कुठल्या मंत्र्यांनी केले. फडणवीस स्वत: गृहमंत्री आहेत. त्यामुळे गावंड प्रकरणातील निष्क्रीयता त्यांना भोवणारी आहे.
आजपर्यंत शांत संयमी असणारे एकनाथ शिंदे विरोधीपक्षनेते पदाची कामगिरी कशी पार पाडतात? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. लोकमतशी बोलताना त्यांना याबाबत सवाल केला असता भाषणबाजी पेक्षा काम महत्वाचे आणि त्यातून जनतेला होणारा लाभ महत्वाचा आहे. या दृष्टीकोनातून मी काम करणार आहे. अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली होती. याचा प्रत्यय त्यांनी या दोनही घटनांबाबत अत्यंत तत्परतेने कृती करून आणून दिला आहे. त्यांच्या या तत्परतेची प्रशंसा राजकीय वर्तुळात होते आहे. त्यांच्या या दोनही पुढाकारांना माध्यमांमध्ये जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे भाजपमध्ये चलविचल सुरु झाली आहे.
एकीकडे शिंदेच्या या बातम्या प्रसिद्ध होत असताना फडणवीस हे उद्योगपतींना भेटले. अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे प्रजाहित दक्ष अशी प्रतिमा सेनेची होते आहे.
तर भाजप सरकारच्या सक्रीयतेबाबत कुठेच काही उमटत नाही. असेच सुरु राहिले तर होते मोदी म्हणून मिळाली गादी’ पण ती टिकवायची कशी असा प्रश्न फडणवीस आणि त्यांच्या सरकारपुढे निर्माण होईल. तर शिंदे यांनी ‘ये तो झाँकी है, आगे बहोत कुछ बाकी है’ अशा सूचक शब्दांत मल्लीनाथी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Eknath Shinde overcomes Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.