Join us

गुवाहाटीला गेलेले आमदार शिवसेनेचे; 'मविआ'ला बहुमत, शरद पवार 'मातोश्री'वर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 5:04 PM

राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे याबाबत चर्चा करणार

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहयचं आणि सरकार टिकवायचं ही काल आणि पुढेपण पक्षाची भूमिका राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीबाबत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील संध्याकाळी ६.३० वाजता मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

अजित पवार म्हणाले की, राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे याबाबत चर्चा करणार आहोत. विधिमंडळाचे जे काही कामकाज आहे त्याबद्दलचा निर्णय विधान सभेचे अध्यक्ष घेतील कारण त्यामध्ये सरकार म्हणून बोलण्याचा काडीचाही अधिकार नाही. गुवाहाटीला जे आमदार गेले आहेत. ते शिवसेनेचे आहेत असं सांगत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून बहुमत आहेच. शिवाय ते शिवसेनेचे आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत असंही अजितदादांनी म्हटलं. 

शिंदे गटाला भाजपात किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावं लागेलएकनाथ शिंदे यांच्यासह फुटलेल्या गटाला कुठल्यातरी रजिस्टर पक्षात विलीन व्हावं लागेल. मूळ पक्षाचं शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. भाजपा किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत विलीन व्हावं लागेल. शिवसेना नाव त्यांना मिळणार नाही. चिन्हही मिळणार नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, शिवसेनेची घटना आहे. त्यावर कार्यकारणीचे सदस्य असतात. विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा आहे. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणुकीत ४-६ टक्के मते मिळवावी लागतात. चिन्ह सहज बदलत नाही. निवडणूक आयोगाकडे ते भूमिका मांडू शकतात. बहुमत आमच्याकडे आहे. कार्यकारणीत एकमत आहे. उद्धव ठाकरे अध्यक्ष आहेत असं नीलम गोऱ्हेंनी सांगितले. 

दोन दिवसांनंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले; दिल्लीला रवानागेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवून आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आज हॉटेलबाहेर पडले आहेत. संख्याबळ जमताच शिंदे यांनी गुवाहाटीहून थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे यांनी मातोश्रीविरोधात बंड पुकारत मी शिवसेनेतच असल्याचं म्हटले आहे. तसेच हिंदुत्व आणि बाळासाहेब हे आमची भूमिका आहे, असेही म्हणत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नाकारले आहे. असे असताना भाजपाचे नेते मात्र, गप्प आहेत. अशावेळी शिंदे यांना दिल्लीमधून ऑफर मिळाल्याचे समजते आहे. 

टॅग्स :शिवसेनाशरद पवारउद्धव ठाकरे