Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 12:30 AM2022-07-07T00:30:24+5:302022-07-07T00:31:59+5:30

जखमी वारकऱ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार स्वखर्चाने करणार उपचार, जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश

'Eknath Shinde' rushed to the aid of Warakaris injured in the accident and will treat them at his own expense | Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

Video: अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार

googlenewsNext

मुंबई : सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

आषाढी वारी अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला  गालबोट लागलं होतं. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द 'एकनाथ' धावून आल्याने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.
 

Web Title: 'Eknath Shinde' rushed to the aid of Warakaris injured in the accident and will treat them at his own expense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.