अवास्तव बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, एकनाथ शिंदेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:46 PM2020-07-21T21:46:11+5:302020-07-21T21:47:51+5:30

मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिके कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली .

Eknath Shinde took care of private hospitals charging unrealistic bills | अवास्तव बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, एकनाथ शिंदेंचे आदेश

अवास्तव बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा, एकनाथ शिंदेंचे आदेश

Next
ठळक मुद्दे मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिके कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली .

मीरारोड - कोरोना रुग्णां कडून मनमानी बिलांची वसुली करणाऱ्या खाजगी रुग्णालयां वर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना दिले असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . हि वेळ एकमेकांना मदत करण्याची असून कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला . 

मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिके कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली . यावेळी खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्सना हसनाळे , आयुक्त डॉ . विजय राठोड , विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील आदी उपस्थित होते . 

बैठकी नंतर शिंदे म्हणाले कि, चेस द व्हायरस मोहीम आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे . चाचण्या जेवढ्या वाढतील तशी रुग्णांची संख्या वाढेल. पण चाचण्या आणि सर्वेक्षण मुळे कोरोनाचे रुग्ण शोधले जातील . वेळीच रुग्ण सापडल्याने मृत्यूचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे . शासना कडून वैद्यकीय साहित्य आदी दिले जात आहे . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासना कडून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे शिंदे यांनी आश्वस्त केले . 
 

Web Title: Eknath Shinde took care of private hospitals charging unrealistic bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.