'त्या' दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 01:27 PM2023-06-21T13:27:40+5:302023-06-21T13:28:42+5:30

मंत्री दीपक केसरकर यांनी एक धक्कादायक किस्सा सांगितला.   

Eknath Shinde would have shot himself in the head on that day Secret explosion of Deepak Kesarkar | 'त्या' दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

'त्या' दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

मुंबई- शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. काल विरोधकांनी राज्यभर जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर बोलताना आज शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी एक धक्कादायक किस्सा सांगितला.   

गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पुकारलेले बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असं धक्कादायक  वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. 

“…तर अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही”; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

दीपक केसरकर म्हणाले, ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला त्या दिवशी शिवसेनेचा वर्धापन दिन होता. वर्धापन दिना दिवशी तुम्ही तुमच्या एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंनी त्यावेळी सांगितलं, ज्यावेळी माझा उठाव यशस्वी होणार की नाही असं वाटायला लागले त्यावेळी मी एक फोन करुन सांगितले असते माझ्यासोबत आलेल्या लोकांची काहीच चूक नाही. यात माझीच चूक झाली आहे आणि तिथेच मी डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं धक्कादायक वक्तव्य केसरकर यांनी केले आहे. 

या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर केसरकर यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी अस्थितेसाठी बंड केले. तुम्ही गद्दार कोणाला म्हणत आहात. शिंदे यांच्यासोबत माझे जवळचे संबंध आहेत. ज्या ज्या वेळी उद्धव ठाकरे वचन देऊन तोडायचे तेव्हा मी शिंदेंना जाऊन सांगायचो. एक गोष्टी महत्वाची म्हणजे त्यांनी उठाव केला. तुम्ही विधीमंडळाच्या नेत्याचा अपमान केला. बंड केले तेव्हा परत येण्याची तयारी दाखवली होती. शिंदे सच्चे शिवसैनिक आहेत. बंड यशस्वी झाले नसते तर मी माझ्यासोबत आलेल्या आमदारांना परत पाठवून मी गोळी झाडून घेणार घेतो, असं म्हणणारी मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो, त्यांच्याकडे मानुसकी आहे, असं म्हणाऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहणार नाही तर कोणाच्या मागे उभं रहायचं, असंही केसरकर म्हणाले. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Eknath Shinde would have shot himself in the head on that day Secret explosion of Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.