Join us

एकनाथ शिंदे झिंदाबाद, 'दसरा' मेळाव्यासाठी अमृता फडणवीसांनी सांगितला फेव्हरेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 11:44 AM

पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचं काय म्हणणं असतं हे ऐकणं गरजेचं असतं.

मुंबई - दसरा मेळाव्याच्या उत्सुकता शिगेला पोहोचली असून शिवसैनिकांसह महाराष्ट्रातील जनतेसाठीही यंदाचा दसरा मेळावा लक्षणीय असणार आहे. कारण, इतिहासात प्रथमच मुंबईत शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पारंपरीक शिवाजी पार्क येथे होत असलेला ठाकरे कुटुंबीयांचा दसरा मेळावा आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत शिंदे गटानेही बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यामुळे, नेमकं कोणाच्या मेळाव्याला जावं आणि कोणाचं भाषण ऐकावं याची सध्या चर्चा रंगली आहे. सुप्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दोन्ही मेळावे ऐकणार असल्याचं म्हटलं आहे. 

पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचं काय म्हणणं असतं हे ऐकणं गरजेचं असतं. त्यामुळे, मी दोघांच्याही मेळाव्यातील भाषण ऐकणार आहे. मात्र माझे फेव्हरेट एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे झिंदाबाद... असे म्हणत शिंदेंच्याच दसरा मेळाव्याला गर्दी होईल, असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी एकप्रकारे शिंदेंच्या दसरा मेळाव्याला समर्थनच दिलं आहे. मुंबईतील मुलूंड उपनगरात दांडीया कार्यक्रमासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोमवारी रात्री काळा चौकी येथील मराठी दांडियाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. यंदा शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट असा दोघांचाही वेगवेगळा दसरा मेळावा होणार आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. कारण, त्याचवेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले. 

टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीसशिवसेनादसराएकनाथ शिंदे