Join us

काेराेना लस घेतल्यानंतर वृद्धाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:02 AM

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, या व्यक्तीला मधुमेहासह इतर आजार होते.

ठळक मुद्देपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, या व्यक्तीला मधुमेहासह इतर आजार होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील ही पहिली घटना आहे, जिथे लस घेतल्यानंतर लगेच मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल, असे पालिका आरोग्य विभागाने सांगितले. गोरेगावच्या  नागरिकाने साेमवारी अंधेरी पश्चिमेतील मिल्लत डायलिसिस सेंटरमध्ये लस घेतली. त्यानंतर लगेचच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने आयसीयूत दाखल केले. संध्याकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, या व्यक्तीला मधुमेहासह इतर आजार होते. मात्र, मृत्यूमागील कारण लस आहे किंवा आजार, हे तपासानंतरच कळेल.  आतापर्यंत मुंबईत चार लाख  जणांचे लसीकरण झाले. त्यातील ४०० जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाने दिली. देशात लस घेतल्यानंतर अन्य कारणांमुळे ४० मृत्यू झाले. परंतु, केंद्र सरकारच्या माहितीनुसार, कोणत्याही मृत्यूचे थेट कारण लसीकरण नाही. 

तज्ज्ञ वैद्यकिय समितीची स्थापनालसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनेच्या चिकित्सेसाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती स्थापन केली आहे. ६५  वर्षीय वृद्धाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या समितीची त्वरित बैठक हाेईल. समिती मृत्यूची कारणमिमांसा करेल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

भिवंडी येथेही लस घेतल्यानंतर झाला हाेता मृत्यूभिवंडी येथे २ मार्च राेजी कोरोनाची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे निदान केले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सुखदेव किर्दत (वय ४४) असे मृत व्यक्तीचे नाव हाेते. ते ठाण्यातील मनोरमा नगर येथील रहिवासी हाेते. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करत होते.

घाबरू नका; लस घ्या, डॉक्टरांचे आवाहनलस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. साधारणत: कोणतीही लस घेतल्यानंतर अशी लक्षणे जाणवू शकतात. परंतु, यामुळे घाबरू नका. भीती न बाळगता निर्धास्तपणे लस घ्या. लस घेण्यात धाेका नाही. लस घेतल्यावर दोन ते तीन दिवस आराम करा. सकस आहार, भरपूर पाणी प्या, असे आवाहन डॉ. रामचंद्र शहा यांनी केले. 

टॅग्स :मुंबईकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या