ट्रेडिंगच्या नादात वृद्धाने गमावले दोन कोटी; ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:35 IST2025-01-02T14:35:10+5:302025-01-02T14:35:29+5:30
वाशी परिसरात राहणाऱ्या ७६ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना ऑनलाईन ट्रेडिंग बद्दल माहिती मिळाली होती.

ट्रेडिंगच्या नादात वृद्धाने गमावले दोन कोटी; ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल
नवी मुंबई : ट्रेडिंगमधून नफा कमावण्याच्या प्रयत्नात वाशी येथे राहणाऱ्या वृद्धाने २ कोटी ३ लाख रुपये गमावल्याची घटना समोर आली आहे. चार महिन्यांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वाशी परिसरात राहणाऱ्या ७६ वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना ऑनलाईन ट्रेडिंग बद्दल माहिती मिळाली होती. ट्रेडिंग मधून अधिकाधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून या व्यक्तीने चार महिन्यात तब्बल २ कोटी ३ लाखांची गुंतवणूक केली. यानंतर मात्र त्यांच्याकडे अधिक पैशाची मागणी होऊ लागली, शिवाय गुंतवलेले पैसेही परत मिळाले नाहीत. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
बेलापूरमधील व्यक्तीसही गंडा
बेलापूरगाव परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचीदेखील अशाच प्रकारे फसवणुकीची घटना घडली आहे. त्यांचे १७ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन हडपले गेले आहेत. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.