ओशिवऱ्यात वृद्ध महिलेची हत्या

By admin | Published: February 12, 2016 01:42 AM2016-02-12T01:42:06+5:302016-02-12T01:42:06+5:30

ओशिवरातील उच्चभ्रू सोसायटीत मुमताज बादशाह (७०) यांची गुरुवारी गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येमागे व्यावसायिक वैमनस्य किंवा संपत्तीचा वाद असल्याचा संशय पोलिसांनी

Elderly woman murdered in Oshiwara | ओशिवऱ्यात वृद्ध महिलेची हत्या

ओशिवऱ्यात वृद्ध महिलेची हत्या

Next

मुंबई : ओशिवरातील उच्चभ्रू सोसायटीत मुमताज बादशाह (७०) यांची गुरुवारी गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येमागे व्यावसायिक वैमनस्य किंवा संपत्तीचा वाद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वृद्धेच्या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुमताज पती रशीदसोबत ओशिवरा येथील रिजवान अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर राहत होत्या. त्यांच्या दोन मुलांपैकी एक लोखंडवालामध्ये पत्नी आणि मुलासह राहतो. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता मुमताज यांचे पती घराबाहेर पडले. साडे दहा वाजता पत्नीशी फोनवर बोलले. मात्र साडे बाराच्या सुमारास फोन केला असता मुमताज यांनी उचलला नाही. बराच वेळ त्यांनी मुमताजना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी मुलाला फोन केला आणि घरी जाऊन मुमताज यांची चौकशी करण्यास सांगितले. नातू या ठिकाणी गेला. बेल वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने बेडरूमच्या मागील खिडकीतून वाकून पाहिले. हातपाय बांधलेल्या अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात मुमताज पडल्या होत्या. नातवाने रशीद यांना फोन केला. रशीद यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुमताज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीच्या कूपर रुग्णालयात पाठविला. हत्येसाठी वापरण्यात आलेला स्वयंपाकघरातील चाकूदेखील पोलिसांना सापडला आहे.

व्यावसायिक वैमनस्यातून हत्या?
रशीद हे नावाजलेलेल रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. त्यांचे अंधेरीच्या साकीनाका आणि पुण्यामध्ये कार्यालय आहे. व्यावसायिक वैमनस्यातून हत्या झाली आहे का, याची चौकशी पोलीस आणि क्राइम ब्रांच करीत आहे. तसेच या हत्येमागे संपत्तीचा वाद असल्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घरातून एकही वस्तू चोरीला गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षारक्षक व येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

Web Title: Elderly woman murdered in Oshiwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.