Join us

उमेदवारांसाठी रविवार ठरला निवडणूक प्रचारवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 1:39 AM

प्रचाराचे वारे आता मुंबईतही वेगाने वाहू लागले आहेत. प्रचारासाठी पंधरवडा हाती असल्याने प्रत्यक्ष मतदानाआधी यानंतर जाहीर प्रचारासाठी फक्त पुढचा रविवार मिळणार आहे.

मुंबई : प्रचाराचे वारे आता मुंबईतही वेगाने वाहू लागले आहेत. प्रचारासाठी पंधरवडा हाती असल्याने प्रत्यक्ष मतदानाआधी यानंतर जाहीर प्रचारासाठी फक्त पुढचा रविवार मिळणार आहे. त्यामुळे सहाही मतदारसंघातील उमेदवारांनी रविवारी मतदारांना गाठण्याचा, त्यांच्या गाठीभेटीचा, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यही त्यांनी साधले. कोणी थेट मैदानात उतरून बॅट हाती घेतली तर कोणी वाढदिवसाचा केकही प्रचारातच कापला. छोट्या-मोठ्या गल्ल्यांमध्ये फेरी मारत उमेदवारांनी रविवार कारणी लावला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी रविवारी आंबेडकरी वस्त्यांमध्ये प्रचार केला. उमेदवारांनी यावेळी आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी वांद्रे पूर्व येथील सिद्धार्थनगर,वांद्रे पूर्व येथील नालंदानगरमधील भंडारा कार्यक्रमाला हजेरी लावली. साकीनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला. सायंकाळी वाकोला येथील सिद्धार्थनगर, कुर्ला येथील विविध वस्त्यांमध्ये भेट दिली व त्यानंतर विलेपार्ले येथील भागांना भेटी देऊन, आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केले व निवडणूक प्रचार करत नागरिकांशी संवाद साधला.भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी दांडे नाका ते जुहू तारा रोड यादरम्यान काढलेल्या मिरवणुकीत सहभाग दर्शविला. त्यानंतर, चांदिवली येथील संघर्षनगर येथे काढलेल्या मिरवणुकीमध्ये उपस्थिती दर्शविली. कुर्ला पश्चिम येथील स्थानक रोड परिसरात व वांद्रे पूर्व येथील सिद्धार्थ कॉलनी येथे काढलेल्या बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीमध्ये महाजन सहभागी झाल्या होत्या. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सांताक्रुझ पश्चिम येथे त्यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये आशिष शेलार उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान अंजारिया यांनीदेखील मतदारसंघातील विविध आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. आंबेडकर जयंतीच्या निमित्तानेदलित वस्त्यांत जाऊन आंबेडकरी समाजाला आपल्या पक्षाकडे वळविण्याचा व मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न सर्व पक्षांनी केल्याचे चित्र दिसून आले.>महामानवाला वंदन करत प्रचारडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. उत्तर पूर्व मुंबईतील उमेदवारांनी महामानवाला वंदन करत प्रचाराला सुरुवात केली. या वेळी विविध कार्यक्रमांना युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी हजेरी लावली. आघाडीच्या उमेदवाराने सकाळी साडेनऊ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भांडुप पश्चिमेकडील भागात पदयात्रा केली.या वेळी मतदारांच्या दारोदारी जात, त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. पुढे सामूहिक बैठका पारपडल्या. तर युतीच्या उमेदवाराने ७ ते ९ वाजेपर्यंत घाटकोपर पूर्वेच्या विविध उद्यानांत भेटी दिल्या. त्यानंतर घाटकोपर परिसरातील रहिवाशांसोबत बैठक पार पडली. सायंकाळी मुलुंडमध्ये प्रचार फेरीपार पडली.>प्रचारादरम्यान बाबासाहेबांना अभिवादनकांदिवली स्थित पंचशील प्रतिष्ठान आणि शैलजा गिरकर स्मृतिस्थळातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी) येथे रविवारी सकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करण्यासह उपस्थितांकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शेट्टी म्हणाले, ‘मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे विचार अंगीकारण्याची मनोकामना करतो. महापुरुषांच्या स्मारकांमुळे त्यांचे विचार, त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवण्याचे महान कार्य घडते. या महापुरुषांचे विचार आपण अंगीकारकले, तरच आपण देशसेवा करू शकू.’उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंती निमित्त त्यांनी अभिवादन केले.शिवाय प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या मतदार संघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरे यांची सभा नको, असे कुणालाही वाटणार नाही, असे म्हणत एका अर्थाने उर्मिला यांनी या निमित्ताने राज यांना सभेसाठी अप्रत्यक्षपणे आर्जव केले आहे.दरम्यान, मनसे लोकसभेची निवडणूक लढवित नसले, तरीदेखील त्यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपची झोप उडाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आनंद आहे. आता उर्मिला यांच्या आर्जवीनंतर राज काय प्रतिसाद देतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असून, लोकसभेच्या निवडणुकीत दिवसागणिक रंगतच येणार आहे.>निवडणुकीला अवघे दोन आठवडे उरले असल्याने प्रचार मोहिमा चांगल्याच वेग घेऊ लागल्या आहेत. कार्यकर्त्यांची कुमक घेऊन प्रत्येक उमेदवार आपला मतदारसंघ पिंजून काढू लागले आहेत. या काळात येणारे सण, उत्सव समारंभांना आवर्जून उपस्थिती लावण्यात येत आहे. यात सुट्टीचा वार असलेला रविवार हा प्रचारासाठी खास ठरत आहे.उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार, यानंतर अंतिम उमेदवारांची यादी १२ एप्रिल रोजी जाहीर झाली. यामुळे मैदानात प्रतिस्पर्धी नेमके कोण-कोण? हे स्पष्ट झाल्यानंतर प्रचार मोहिमांनी वेग घेतला आहे. प्रभात फेऱ्यांपासून सुरू होणारी प्रचार मोहीम रात्री प्रत्येक विभागांमध्ये होणाºया राजकीय सभांवर संपत आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातही अशीच लगबग गेल्या चार दिवसांपासून दिसून येत आहे. काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी रोड शो पाठोपाठ कॉर्नर मीटिंगवर भरला दिला आहे, तर शिवसेनेने प्रचार फेºया, प्रत्येक विभागांमध्ये मतदारांना भेट घेत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर त्यांना आदरांजली वाहून उमेदवारांनी आज प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर, प्रचार मोहिमांनी वेग घेतला. काँग्रेसने बीआयटी चाळबरोबरच नागपाडा जंक्शन, संकाली स्ट्रीट इक्बाल कमाली हॉटेल, मौलाना आझाद रोड रोलॅक्स हॉटेल या भागांमधील प्रचारावर जोर दिला.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019प्रिया दत्तमुंबई उत्तर पूर्वमुंबई उत्तर