निवडणूक आयोगाचा ९३ पोलीस निरीक्षकांच्या बढतीला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:04 AM2021-01-01T04:04:32+5:302021-01-01T04:04:32+5:30

तिघांना ग्रामपंचायत निवडणुकीचा अडसर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य पोलीस दलातील बढती दिलेल्या ९६ पैकी ९३ अधिकाऱ्यांच्या ...

Election Commission gives green light to promotion of 93 police inspectors | निवडणूक आयोगाचा ९३ पोलीस निरीक्षकांच्या बढतीला हिरवा कंदील

निवडणूक आयोगाचा ९३ पोलीस निरीक्षकांच्या बढतीला हिरवा कंदील

googlenewsNext

तिघांना ग्रामपंचायत निवडणुकीचा अडसर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य पोलीस दलातील बढती दिलेल्या ९६ पैकी ९३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला राज्य निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविला आहे. ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तिघांना मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर ‘रिलिव्ह’ करण्याची सूचना करण्यात आली आहे.

नरसिंग आकुरकर, संजय पुरंदरे व विश्वंभर गोल्डे अशी त्यांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षापासून लांबलेल्या निरीक्षकाच्या साहाय्यक आयुक्त, उपअधीक्षक पदाच्या बढतीला २४ डिसेंबरला मुहूर्त मिळाला. गृह विभागाने ९६ अधिकाऱ्यांच्या बढत्या केल्या होत्या. मात्र राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली. आयोगाची मान्यता न घेतल्याने प्रस्ताव आयोगाकडे पाठविला होता. तिघे वगळता अन्य अधिकारी हे शहरी भागात व अन्य विभागांत नियुक्तीला असल्याने त्यांना मान्यता देण्यात आली.

संबंधितांना नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी १ जानेवारीनंतर तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचना घटकप्रमुखांना करण्यात आल्या आहेत.

....................

Web Title: Election Commission gives green light to promotion of 93 police inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.