निवडणूक फिव्हर गेला ‘डोक्यात’

By Admin | Published: October 13, 2014 10:48 PM2014-10-13T22:48:49+5:302014-10-13T22:48:49+5:30

एरव्ही क्रिकेट किंवा फुटबॉल वर्ल्डकपलाच युनिक हेअर स्टाईल करणा:या तरुणाईने निवडणुकांचा इव्हेंटही चांगलाच गाजवला आहे.

Election Fever went 'Head' | निवडणूक फिव्हर गेला ‘डोक्यात’

निवडणूक फिव्हर गेला ‘डोक्यात’

googlenewsNext
पूजा दामले - मुंबई
एरव्ही क्रिकेट किंवा फुटबॉल वर्ल्डकपलाच युनिक हेअर स्टाईल करणा:या तरुणाईने निवडणुकांचा इव्हेंटही चांगलाच गाजवला आहे. स्पाइक्स, लाँग हेअर, पोनी या हेअरडूच्या बाहेर पडून त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या चिन्हांना आपलेसे केले आहे. कोणाच्या डोक्यावर कमळ उगवले आहे तर कोणाच्या डोक्यावर घडय़ाळ उमटले आहे. कोणी काँग्रेसचा हात कोरून घेतला आहे, तर कोणी शिवसेनेचे धनुष्य. एकंदरीत इलेक्शन फिव्हर डोक्यात गेला आहे. 
तरुणांच्या हातात देशाचे भवितव्य असते, असे म्हटले जाते. म्हणूनच नवनव्या शकला लढवून तरुणाईला आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न पक्ष करीत आहेत. ‘जो चीज चलती हैं, वहीं फॅशन में दिखती हैं..’ हे तर आता तरुणाईचे ब्रीद बनले आहे. हेअर स्टाईल करताना पक्षांची चिन्हं कोरून वा रंगवून घेण्याकडे सध्या कल दिसून येत आहे. तरुणाईतही निवडणुकीची मोठी क्रेझ असून घडामोडी जाणून घेण्यात त्यांना इंटरेस्ट असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याच घडामोडी विडंबनात्मक रूपात सर्वत्र पसरवण्यात तरुणाईच अग्रेसर आहे.  काही तरुण अशा हेअर स्टाईल करून प्रचारात सहभागी होत असून काहीजण प्रत्यक्ष सक्रिय नसतानाही हौस म्हणून हेअर स्टाईल करून घेत असल्याचे हेअर स्टायलिस्ट बलराम यांनी सांगितले. 
 
अशी होते युनिक हेअर स्टाईल : केस मागून बारीक कापले जातात. नंतर त्यात राजकीय पक्षांची चिन्हे कोरून घेतली जातात. काही जण तेवढय़ाच भागातले केस कलर करून घेत आहेत. ही हेअर स्टाईल किमान 15 दिवस टिकते. त्यामुळे प्रचारसभा आणि रॅलीमध्ये सहभागी झालेले हे तरुण सर्वाचेच लक्ष वेधून घेतात.

 

Web Title: Election Fever went 'Head'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.