Join us  

निवडणूक फिव्हर गेला ‘डोक्यात’

By admin | Published: October 13, 2014 2:14 AM

एरव्ही क्रिकेट किंवा फुटबॉल वर्ल्डकपलाच युनिक हेअरस्टाईल करणाऱ्या तरुणाईने निवडणुकांचाही इव्हेंटही चांगलाच गाजवला आहे

पूजा दामले, मुंबईएरव्ही क्रिकेट किंवा फुटबॉल वर्ल्डकपलाच युनिक हेअरस्टाईल करणाऱ्या तरुणाईने निवडणुकांचाही इव्हेंटही चांगलाच गाजवला आहे. स्पाईक्स, लाँग हेअर, पोनी या हेअरडूच्या बाहेर पडून त्यांनी विविध राजकीय पक्षांच्या चिन्हांना आपलेसे केले आहे. कोणाच्या डोक्यावर कमळ उगवले आहे तर कोणाच्या डोक्यावर घड्याळ उमटले आहे. कोणी काँग्रेसचा हात कोरून घेतला आहे तर कोणी शिवसेनेचे धनुष्य. एकंदरीत इलेक्शन फिव्हर डोक्यात गेला आहे. तरुणांच्या हातात देशाचे भवितव्य असते, असे म्हटले जाते. म्हणूनच नवनव्या शकला लढवून तरुणाईला आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न पक्ष करत आहेत. ‘जो चीज चलती है, वही फॅशन में दिखती है...’ हे तर आता तरुणाईचे ब्रीद बनले आहे. हेअर स्टाईल करताना पक्षांची चिन्ह कोरून वा रंगवून घेण्याकडे सध्या कल दिसून येत आहे. तरुणाईतही निवडणुकीची मोठी क्रेझ असून घडामोडी जाणून घेण्यात त्यांना इंटरेस्ट असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याच घडामोडी विडंबनात्मक रुपात सर्वत्र पसरवण्यात तरुणाईच अग्रेसर आहे. आघाडी आणि महायुती तुटल्यामुळे सर्व पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपल्या पक्षाला बहुमत मिळावे म्हणूनच प्रत्येक पक्ष जोरदार कॅम्पेनिंग करताना दिसत आहे. प्रचाराचे सगळे फंडे वापरताना हेअरस्टाईल, टॅटू हे तर टाळता येणे शक्यच वाही. त्यामुळेच कमळ, धनुष्य, हात, घड्याळ आणि इंजिन ही चिन्हे डोक्यावर आणि चेहऱ्यावर झळकू लागली आहेत.