महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. आता पवार यांची अध्यक्षपदावरही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनची कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर झाली. यात अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली.
खासदार शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. भाजपकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. यात भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती. आता राहित पवार यांचीही क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करुन आभार मानले आहेत. MCA च्या सदस्यपदी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्य क्लबचं आणि अध्यक्षपदी निवडून दिल्याबद्दल MCA च्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार! असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
'आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्षे खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, मा. Ajit Pawar दादा आणि Supriya Sule ताई यांचा पाठिंबा, तसंच mca चे अनेक मा. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली. उपाध्यक्षपदी निवड झालेले माझे सहकारी किरण सामंत,सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही अभिनंदन. माजी अध्यक्ष अजय शिर्के आणि रियाज बागवान यांचंही मोठं सहकार्य लाभलं, असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
suryakumar yadav: किंग कोहलीच्या स्टोरीवर 'सूर्या' झळकला; 'विराट' कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना!
'क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता #MCA च्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असंही रोहित पवार यांनी म्हटले आहे.