ELECTION RESULT- नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराचा विजय- मुख्यमंत्री

By admin | Published: February 23, 2017 06:35 PM2017-02-23T18:35:57+5:302017-02-23T18:41:44+5:30

महाराष्ट्रातल्या नागरिकांचे आभार मानतो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र मतदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली

ELECTION RESULT- The victory of the transparent administration of Narendra Modi - Chief Minister | ELECTION RESULT- नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराचा विजय- मुख्यमंत्री

ELECTION RESULT- नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराचा विजय- मुख्यमंत्री

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - महाराष्ट्रातल्या नागरिकांचे आभार मानतो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र मतदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभारावर विश्वास दाखवत जनतेनं विजय दिला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही यावेळी उपस्थित होते.

आम्ही मुंबई महापालिकेच्या 195 जागा लढलो होतो. त्यापैकी 81 जागा मिळाल्या आहेत. काही जागांवर कमी मताधिक्क्यानं पराभूत झालो आहोत. मात्र तरीही भाजपासाठी मुंबईकर जनतेनं मोठा कौल दिला आहे. मोदींच्या पारदर्शी प्रामाणिक कारभार आणि विश्वासाला जनतेनं साथ दिली आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पुणे, अकोला, अमरावती, सोलापूर, नागपूर, नाशिकमध्ये आमचा 521 जागी विजय झाला आहे.

(BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)
(BMC ELECTION RESULTS : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी)
भाजपानं सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. भाजप जिल्हा परिषदेमध्ये आम्ही बहुमताकडे जाऊ, जिल्हा परिषद हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता भाजपाचा झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात आम्हाला मोठं यश मिळालं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Web Title: ELECTION RESULT- The victory of the transparent administration of Narendra Modi - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.