Election Results 2022: “भाजपवाल्यांनी नोटा वाटल्यामुळेच आम्हाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:18 PM2022-03-10T17:18:27+5:302022-03-10T17:19:42+5:30

Election Results 2022: भाजपने मिळालेला विजय पचवून सूडाचे राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करावे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

election results 2022 shiv sena sanjay raut claims that bjp used currency in polls so we got fewer votes than nota | Election Results 2022: “भाजपवाल्यांनी नोटा वाटल्यामुळेच आम्हाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली”: संजय राऊत

Election Results 2022: “भाजपवाल्यांनी नोटा वाटल्यामुळेच आम्हाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली”: संजय राऊत

Next

मुंबई: देशात झालेल्या पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल (Election Results 2022) हळूहळू हाती आले. सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार भाजपने उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या चार राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. या चारही राज्यात भाजप सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया आली असून, भाजपवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. भाजपवाल्यांनी नोटा वाटल्यामुळे आम्हाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला प्रचंड यश मिळाले. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक टोला लगावण्यात आला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो. हे खरे आहे. पंजाबमध्ये भाजप एक राष्ट्रीय पक्ष असूनही पराभूत झाला. याचेही उत्तर भाजपने द्यावे. आम्हाला नोटांपेक्षा कमी मते मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरी उत्तर प्रदेश आणि गोव्यात आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरू राहील. कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो, अशी टीका संजय राऊत यांनी केला. 

भविष्यात आम्ही काम करत राहू

उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्यांना यश मिळाले नाही. याचा अर्थ लढाई संपली असा होत नाही. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही जिथे-जिथे निवडणूक लढलो, ती आमची सुरुवात आहे. भविष्यात आम्ही काम करत राहू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय प्राप्त झाला असला तरी विजय पचवणे भाजपने शिकले पाहिजे. पराभव पचवणे अनेकदा सोपे असते पण काहींना विजय पचवता येत नाही. मतदारांनी दिलेला विजय पचवा आणि सुडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, देशाचे आणि राज्याचे हित पाहा इतकेच मी सांगतो असेही संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा 'नोटा'सोबत असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितले होते. याचवेळी या ट्विटमध्ये भाजपने, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांची तुलना नोटासोबत केली आहे. नोटाला १.१ टक्का लोकांनी मतदान केले, म्हणजेच नोटाला एकूण ६४३९ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला ५०५८ मते मिळाली आहेत. शिवसेनेला ०.२ टक्के म्हणजेच १०९९ मते मिळाली आहेत. तसेच, या दोन्ही पक्षांची मिळून ६१५७ मते आहेत, असे ट्विट भाजपने केली आहे. 
 

Web Title: election results 2022 shiv sena sanjay raut claims that bjp used currency in polls so we got fewer votes than nota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.