Join us

Election: बिगुल वाजला रे वाजला... 92 नगरपालिकांसाठी निवडणुकांची तारीख ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 6:34 PM

महराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार

मुंबई - राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवसांतच निवडणुकांच्या घोषणेचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 

महराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली जाणार असून 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दरम्यान, जेथे आवश्यकता भासेल त्या ठिकाणी 18 ऑगस्ट रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच दुस-या दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी करुन निकाल जाहिर केले जाणार आहेत. 

'अ' वर्गातील नगरपरिषदा

भुसावळ (जि. जळगाव)बारामती (जि. पुणे)बार्शी (जि. सोलापूर)जालना (जि. जालना)बीड (जि. बीड)उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

'ब' बर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हामनमाड सिन्नरयेवला

धुळे जिल्हा दोंडाईचा-वरवाडेशिरपूर-वरवाडे

नंदुरबार जिल्हाशहादा

जळगाव जिल्हाअमळनेरचाळीसगाव

अहमदनगर जिल्हासंगमनेरकोपरगावश्रीरामपूर

पुणे जिल्हाचाकणदौंड

सातारा जिल्हाकराडफलटण

सांगली जिल्हाइस्लामपूरविटा

सोलापूर जिल्हाअक्कलकोटपंढरपूरअकलूज (नवनिर्मित)

कोल्हापूर जिल्हाजयसिंगपूर

औरंगाबाद जिल्हाकन्नडपैठण

बीड जिल्हाअंबेजोगाईमाजलगावपरळी-वैजनाथ

लातूर जिल्हाअहमदपूर

अमरावती जिल्हाअंजनगाव-सुर्जी

'क' बर्गातील नगरपरिषदा

नाशिक जिल्हाचांदवडनांदगावसटाणाभगूर

जळगाव जिल्हावरणगावधरणगावएरंणडोलफैजपूरपारोळायावल

अहमदनगर जिल्हाजामखेडशेवगावदेवळाली प्रवरापाथर्डीराहता राहुरी

पुणे जिल्हाराजगुरूनगरआळंदीइंदापूरजेजुरीसासवडशिरुर

सातारा जिल्हाम्हसवडरहिमतपूरवाई

सांगली जिल्हाआष्टातासगावपलूस

सोलापूर जिल्हामोहोळदुधनीकरमाळाकुर्डुवाडीमेंदगीमंगळवेढासांगोला

कोल्हापूर जिल्हागडहिंग्लजकागलकुरुंदवाडमुरगूडवडगाव

औरंगाबाद जिल्हागंगापूरखुल्ताबाद

जालना जिल्हाअंबडभोकरदनपरतूर

बीड जिल्हागेवराईकिल्ले धारुर

उस्मानाबाद जिल्हाभूमकळंबमुरुमनळदुर्गउमरगापरंडा तुळजापूर

लातूर जिल्हाऔसानिलंगा

अमरावती जिल्हादर्यापूर

बुलडाणा जिल्हादेऊळगाव राजा

4 नगरपंचायतांच्याही निवडणुका

अहमदनगर - नेवासा पुणे/आंबेगाव - मंचर (नवनिर्वाचित)पुणे/बारामती - माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)सोलापूर/मोहोळ - अनगर 

 

टॅग्स :निवडणूकमहाराष्ट्रसोलापूरमतदान