मुंबई- सत्ता ही जनतेच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्यासाठी असते. मात्र टीव्हीवर बघितलं तर सत्ता गुवाहाटीला, गुजरातला जाण्यासाठी असते असं वाटतं. ही सत्ता नाही, दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबईत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अनेकजण इतर पक्षात गेले, पक्ष फोडले. हे पहिल्यांदाच झाले आहे. आम्ही गुवाहाटीसाठी निवडून आलेलो नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. आगामी निवडणुकीबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता, राज्यात आघाडी कोणासोबत करायची, हा निर्णय वरिष्ठ घेतील, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा आवडता विषय निवडणुक आहे. जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीसाठी तयार असतो. महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या एकत्र विरोधात लढावं, असं शरद पवारांना वाटतं. चर्चेतून मार्ग निघतील, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.