Join us

निवडणुकांनी पाणी अडवले!

By admin | Published: October 11, 2014 10:59 PM

सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आह़े

मुंबई : सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीला जोर आहे. पण या निवडणुकांच्या कामात स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी गुंतल्याने त्याचा परिणाम नागरी सुविधांवर होऊ लागला आह़े मुंबईकरांना पाणी पुरवणा:या जल अभियंत्या खात्यातील बहुसंख्य कर्मचारी-अभियंते निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्याचा फटका पाणीपुरवठय़ावर होऊ लागला आह़े या पाणीकपातीचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटत आहेत़ याची कबुली देत कमी दाबाच्या पाणीपुरवठय़ासाठी तांत्रिक बिघाड हेदेखील एक कारण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल़े 
कुर्ला येथील वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आह़े, अशी तक्रार स्थानिक नगरसेविका अनुराधा पेडणोकर यांनी केली़ हा मुद्दा उचलून धरीत अशीच परिस्थिती चुनाभट्टी, अंधेरी पश्चिम, वरळी आणि मालाड या विभागात असल्याचे सर्वपक्षीय सदस्यांनी निदर्शनास आणल़े ऐन निवडणुकीच्या काळात पाण्याची समस्या सुरू असल्याने नगरसेवकांना रोषास सामोरे जावे लागत असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली़
या विभागांत कमी दाबाने पाणीपुरवठय़ाबरोबरच गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची वेळी सतत बदलत आह़े मालाड पूर्व येथील रहिवाशांनी तर दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याची तक्रार केली असल्याचे भाजपाचे सदस्य विनोद शेलार यांनी सांगितल़े यावर खुलासा करताना भातसा धरणातून होणा:या पाणी वितरणामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने ही समस्या सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास खरगे यांनी सांगितल़े
साहाय्यक आयुक्तही व्यस्त
निवडणुकीच्या कामात अभियंत्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत़े असे एकूण शंभर अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. पण या वेळेस साहाय्यक आयुक्तही निवडणुकीत व्यस्त असल्याने पाण्याच्या समस्यांची तक्रार कोणाकडे करायचे, अशी खंत विनोद शेलार यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)
 
थेट कर्मचारी निवडल्याचा परिणाम
च्प्रत्येक विभागातून परस्पर कर्मचारी न घेता सामान्य प्रशासन विभागातून कर्मचा:यांची मागणी करावी, अशी विनंती पालिकेने निवडणूक आयोगाला केली होती़ 
च्परंतु नेहमीप्रमाणो थेट कर्मचारी घेतल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही निवडणुकीच्या कामासाठी गेल़े याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याची कबुली प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत दिली़
 
1मुंबईत अधूनमधून पावसाने सूर लावून मुंबईकरांचा सूर बिघडवला आह़े मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत़ मात्र अशा वेळी कीटकनाशक विभागातील कर्मचारी निवडणूक कामास गेल्यामुळे धूरफवारणीचेही बारा वाजले आहेत़ त्यामुळे अत्यावश्यक सेवांना निवडणूक कामातून वगळण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याची विनंती सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे केली आह़े
2या वर्षी आतार्पयत सात हजारांहून अधिक कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले आहेत़ मात्र यात जल अभियंता खात्याप्रमाणोच कीटकनाशक विभाग, आरोग्य खात्याचे कर्मचारीही निवडणुकीत व्यस्त आहेत़ त्यामुळे मलेरिया, डेंग्यू वाढत असताना धूरफवारणी पण नाही आणि रुग्णालयात कर्मचारीही नाहीत, अशी अवस्था असल्याचे शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणल़े
3विभाग कार्यालयांमध्येही हीच अवस्था आह़े प्रत्येक विभागातील तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत़ त्यामुळे विभाग कार्यालयांवरील कामांवरही परिणाम होत आह़े ही गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने न्यायालयात जाऊन अत्यावश्यक सेवेतील कर्मचा:यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती करावी, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली़ मात्र आता वेळ निघून गेल्याने ही खबरदारी पुढच्या वेळेस घेण्यात येईल, असे मोघम उत्तर प्रशासनाने दिल़े