Join us

आज आरोग्य विद्यापीठाच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 04:37 IST

मुंबई : राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.

मुंबई : राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. पण, याच निवडणुकांबरोबर सर्वांचे लक्ष लागू राहिलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. गुरुवार, २८ डिसेंबर रोजी ही निवडणूक राज्यातील ३२ मतदन केंद्रावर होणार आहे. निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून विद्यापीठाने चांगलीच कंबर कसली आहे. विद्यापीठाने जय्यत तयारी केली असून गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. राज्यात निवडणुकांचे कामकाज पाहण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे.