Join us

गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 5:12 AM

आधी या निवडणुका २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही मुदत संपूनही नवीन आदेश न निघाल्याने गोंधळाची परिस्थिती होती.

मुंबई : २५० वा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या विधि व न्याय विभागाने मंगळवारी या बाबतचे परिपत्रक काढले. आधी या निवडणुका २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही मुदत संपूनही नवीन आदेश न निघाल्याने गोंधळाची परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक काढण्यात आले आहे.या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका पारदर्शक होण्यासाठी निवडणूक नियमांची नितांत आवश्यकता आहे. या नियमांचे प्रारुप २४ ऑक्टोबर २०१९ रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते आणि त्यावर नागरिक, गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना दिल्या होत्या. मध्यंतरी नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन, त्यानंतर कर्मचारी वर्ग शेतकरी कर्जमाफी योजनेत सहकार विभागातील कर्मचारी, अधिकारी व्यग्र होते.>आणखी दोन महिनेनिवडणूक नियमांना अंतिम देण्यासाठी आणखी किमान दोन महिने लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सदर संस्थांच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.