Electric Bus: BEST लवकरच खरेदी करणार ९०० Electric AC डबल डेकर बस; आदित्य ठाकरेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 08:28 PM2022-01-27T20:28:28+5:302022-01-27T20:30:26+5:30
Electric Buses in Mumbai: लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर आता डबल डेकर इलेक्ट्रीक एसी बसेस (Double Decker Electric Ac Busses) धावताना दिसणार आहेत.
Electric Buses in Mumbai: लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर आता डबल डेकर इलेक्ट्रीक एसी बसेस (Double Decker Electric Ac Busses) धावताना दिसणार आहेत. बेस्ट आपल्या ताफ्यात लवकरच ९०० इलेक्ट्रीक बसेस सामील करणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. शहरात १० हजार इलेक्ट्रीक बसेस आणण्याचं आमचं लक्ष्य आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. इंधनावर चालणाऱ्या बसेसच्या जागी आम्ही इलेक्ट्रीक बसेस आणू इच्छीत असल्याचंही ते म्हणाले.
बेस्ट समितीनं यापूर्वी ९०० एसी इलेक्ट्रीक डबल डेकर बसेस १२ वर्षांसाठी वेट लीजवर खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेसाठी ३६०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च येणार आहे. इलेक्ट्रीक बस खरेदीसाठी राज्य सरकारनं महाराष्ट्र क्लीन एअर प्रकल्पांतर्गत बेस्टला यापूर्वीच ९९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे सुरुवातीला डबल डेकर बसेसच्या खरेदीसाठी वापरले जातील.
The BEST double-decker, now electric!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
CM Uddhav Thackeray and I have been personally keen on reviving Mumbai’s iconic double-decker buses. pic.twitter.com/lQkjvKlVgh
Along with Mumbai, I have requested municipal commissioners of other cities who are procuring electric buses to also add double-decker electric buses into their fleets on busy routes.— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 27, 2022
"या वर्षी 225 डबल डेकरची पहिली खेप येणं अपेक्षित आहे. २२५ बसची पुढील खेप मार्च २०२३ पर्यंत आणि उर्वरित ४५० बस जून २०२३ पर्यंत पोहोचतील," अशी प्रतिक्रिया बेस्टचे महाव्यवस्थापक लोकश चंद्रा यांनी दिली.
पर्यावरणपुरक बसेस
सध्या मुंबईत ४८ नियमित डबल डेकर बसेस आहेत. “पर्यावरणपूरक असणार्या ९०० नवीन एसी डबल डेकरच्या खरेदीमुळे या बस एक दशकाहून अधिक काळ रस्त्यावर राहतील याची खात्री होईल. यामुळे बेस्ट बसेसच्या केवळ ताफ्यातच भर पडणार नाही, तर आमची प्रवासी संख्याही वाढेल. तसंच होणारी गर्दीही कमी होण्यास मदत मिळेल." असंही लोकेश चंद्रा म्हणाले.