इलेक्ट्रिक बस मुंबईला प्रदूषणमुक्त करणार : वडाळा बेस्ट बस आगारात पार पडले लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:32 AM2017-11-14T02:32:38+5:302017-11-14T02:32:58+5:30
कर्णकर्कश आवाज आणि धूर सोडत जाणारी अलीकडे तयार झालेली बेस्ट बसची प्रतिमा आता बदलणार आहे. बेस्टला प्रदूषणमुक्त करणारी इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
मुंबई : कर्णकर्कश आवाज आणि धूर सोडत जाणारी अलीकडे तयार झालेली बेस्ट बसची प्रतिमा आता बदलणार आहे. बेस्टला प्रदूषणमुक्त करणारी इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या बसचे लोकार्पण वडाळा बेस्ट बस आगारात नुकतेच झाले. प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवास असलेली ही राज्यातील पहिलीच हायटेक बस ठरणार आहे.
या बसगाडीसाठी सन २०१५च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार, बॅटरीवर चालणाºया सहा बस खरेदी करण्यात आल्या आहेत. प्राथमिक स्वरूपात फोर्ट परिसरात या बस फेºया चालविण्यात येणार आहेत. येत्या काळात असे उपक्रम राबविण्यास केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी २० कोटी देण्याचे आश्वासन दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. डिझेल बससाठी प्रति किमी २० तर सीएनजीसाठी १५ रुपये लागतात. इलेक्ट्रिक बससाठी प्रति किमी फक्त ८ रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायक होणार असून, आर्थिक फायदाही होणार आहे.