Join us  

बेस्टच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 7:06 AM

प्रवाशांना अधिकाधिक सेवा उपलब्ध होण्यासाठी बेस्टकडून विविध योजना आखल्या जात आहेत. जास्तीत जास्त बस सेवेत आणण्यासाठी बेस्टचा भर राहिला आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या २,१०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस घेण्याच्या निर्णयाला टाटा मोटर्सने आव्हान दिले होते. मात्र, शुक्रवारी टाटा मोटर्सची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात २,१०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच या बस दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना अधिकाधिक सेवा उपलब्ध होण्यासाठी बेस्टकडून विविध योजना आखल्या जात आहेत. जास्तीत जास्त बस सेवेत आणण्यासाठी बेस्टचा भर राहिला आहे. एक हजार ४०० बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढल्या होत्या. त्यात नंतर आणखी ७०० बस घेण्यासाठी गेल्यावर्षी निविदा काढलेली होती. निविदा उघडल्यानंतर ओलेक्ट्रा कंपनी पात्र ठरली. मात्र, यावर दुसरा निविदाकार असलेला टाटा मोटर्सने आक्षेप घेत उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी झालेल्या झालेल्या सुनावणीत निर्णय देताना उच्च न्यायालयाची पुन्हा निविदा मागवण्याची सूचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची १,४०० बससाठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवली. यामुळे इव्हे ट्रान्सला मिळालेला दाेन हजार १०० एकमजली बसचा करार योग्य ठरवल्याने दाेन हजार १०० इलेक्ट्रिक बस घेण्याचा बेस्टचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात लवकरच या बस दाखल होणार असल्याने आता इलेक्ट्रिक बसची संख्या वाढणार आहे.    जुन्या डिझेल बस या पर्यावरणीय नियमावलीनुसार १५ वर्षांनंतर सेवेतून बाद होतात. ही कसर तत्काळ भरून निघत नसल्याने बेस्टच्या ताफ्यात सध्या बसचा तुटवडा जाणवत आहे. 

अशा माॅडेलच्या बस येणार -- ओलेक्ट्रा व इबे - एकमजली वातानुकूलित बस - दाेन हजार १००  - स्विच मोबिलिटी - दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस - २००        प्रीमियम बस - ४००          - दुमजली इलेक्ट्रिक वातानुकूलित बस - ७००मिडी डिझेल बस - १५०

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरमुंबई महानगरपालिकाबेस्ट