मुंबई महानगर प्रदेशातील निवासी व व्यापारी प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकिल चार्जिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:08 AM2021-09-17T04:08:03+5:302021-09-17T04:08:03+5:30
मुंबई मुंबई महानगर प्रदेशातील निवासी आणि व्यापारी प्रकल्पांमध्ये टाटा पॉवर ईव्ही चार्जिंगच्या परिपूर्ण सुविधा पुरवणार आहे. हे पाऊल उचलून ...
मुंबई
मुंबई महानगर प्रदेशातील निवासी आणि व्यापारी प्रकल्पांमध्ये टाटा पॉवर ईव्ही चार्जिंगच्या परिपूर्ण सुविधा पुरवणार आहे. हे पाऊल उचलून टाटा पॉवरने शून्य-कार्बन भविष्यासाठीची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे. शाश्वत पद्धतींचा अवलंब केला जाण्याच्या जबाबदारीला प्राथमिकता देत टाटा पॉवर पर्यावरणस्नेही उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून जागतिक डिकार्बनायझेशन अजेंडा पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.
जगभरात होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे रस्त्यांवरील गाड्यांची वाहतूक हे आहे. गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची गंभीर दखल घेत सरकारने राज्यात ईव्ही चार्जिंग पायाभूत सोयीसुविधा वेगाने विकसित करण्याच्या आपल्या योजनांची घोषणा नुकतीच केली. याला अनुसरून टाटा पॉवरच्या या सुविधेमध्ये ईव्ही चार्जिंगच्या परिपूर्ण सुविधेमध्ये ईव्ही गाड्या वापरणाऱ्या सर्व रहिवाशांना तसेच पाहुण्यांना हे चार्जर्स वापरता येतील. इलेक्ट्रिक वाहनांसाठी इन्स्टॉलेशन आणि चार्जिंग सुविधेबरोबरीनेच ३६५ दिवस सेवा, देखरेख सेवा, रिमोट व्हेईकल चार्जिंग मॉनिटरिंग, टाटा पॉवरच्या ईझेड चार्ज मोबाइल ऍप्लिकेशनमार्फत ई-पेमेंटची सुविधा पुरवली जाणार आहे. यामुळे रहिवाशांना एकसमान आणि सर्वसमावेशक ईव्ही चार्जिंग अनुभव मिळेल.
टाटा पॉवरने भारतभरातील १२० पेक्षा जास्त शहरांमध्ये ६०० पेक्षा जास्त पब्लिक चार्जर्स आणि ५ हजार पेक्षा जास्त होम चार्जर्सचे नेटवर्क उभारले आहे. सार्वजनिक चार्जिंग, कॅप्टिव्ह चार्जिंग, घरी आणि कामाच्या ठिकाणी वापरली जाऊ शकतील अशी चार्जिंग स्टेशन्स अशा ईव्ही इकोसिस्टिमच्या सर्व विभागांमध्ये टाटा पॉवर कार्यरत असून डीसी चार्जर्स आणि एसी चार्जर्ससह सर्व प्रकारचे चार्जर्स त्यांनी तैनात केले आहेत.