Join us

इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग,  अक्षय्य ऊर्जेचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 12:23 PM

नवी दिल्ली येथील बेसिल कंपनीसोबत मुंबईत ८७ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. राज्यात साधारणपणे ५०० चार्जिंग स्टेशन उभारली जातील.

बिपीन श्रीमाळी मॅनेजिंग डायरेक्टर, महाप्रितहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. त्या माध्यमातून आपण न्याय, समता, बंधुता या तत्त्वांच्या आधारे मार्गक्रमण करत आहोत. महात्मा फुले नवीनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या सहयोगी कंपनीची २०२१ मध्ये स्थापना करण्यात आली. महाप्रितद्वारे सौरऊर्जा प्रकल्पासह अक्षय्य ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, कृषी प्रक्रिया मुख्य साखळी आणि जैव इंधन प्रकल्प, परवडणारी घरे तसेच केंद्र शासनाचा गृहनिर्माण प्रकल्प, महामार्ग -रस्ते प्रकल्प, पर्यावरण आणि हवामान बदलासाठी ऊर्जा लेखापरीक्षण योजना, नवीन आणि उदयोन्मुख ऊर्जा तंत्रज्ञान प्रकल्प, विशेषत: ग्रीन हायड्रोजन, भविष्यातील ऊर्जा एकत्रिकरण प्रकल्प, सॉफ्टवेअर तंत्रज्ञान आणि सीएसआर प्रकल्प हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.

नवी दिल्ली येथील बेसिल कंपनीसोबत मुंबईत ८७ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. राज्यात साधारणपणे ५०० चार्जिंग स्टेशन उभारली जातील. पुणे महानगरपालिकेसोबत ऊर्जा बचत, कमांड कंट्रोल सिस्टीम, ५० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुंबईत मालाडच्या खाडीतील तिवराच्या जंगलाचे संवर्धन सुरू आहे. निर्धूर चुलींचे लाभार्थ्यांना नि:शुल्क वाटप सुरू आहे.

सांगली जिल्ह्यात महारवतन व इनामी अंतर्गत तसेच खासगी अशा ६०० जमीनधारकांच्या १०५ एकरवर १२५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभा राहत आहे. विजेची विक्री करून पडीक जमिनींच्या धारकास प्रती वर्ष ३० हजार भाडे मिळेल. ठाणे जिल्ह्यातील जांभूळ गावात १० एकर क्षेत्रात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून ५० शहरांजवळ प्रत्येकी १० मेगावॅटचे सौर स्टेशन कार्यान्वित होत आहेत. हा २३०० कोटींचा प्रकल्प आहे. यातून मागासवर्गीय घटकांना रोजगार उपलब्ध होईल. हाजी अली जंक्शन, वांद्रे उड्डाणपूल जंक्शन तसेच गर्दीच्या २५ ठिकाणी एक्सलेटर उभारणी करणार आहोत. राज्यात २४६ कृषी मूल्य साखळी तयार करत आहोत. सुरभी प्रकल्पाअंतर्गत ६६ ठिकाणी केंद्र शासनाशी निगडित गोपालन (काऊ फार्मिंग) योजना सुरू होत आहे. ‘क्लस्टर’ अंतर्गत कांदे व टोमॅटोवर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाईल. नाफेड महाप्रित शेतकरी बाजार सुरू केले जाणार आहेत. 

‘महाप्रित’चे विविध विभाग अक्षय्य ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने आरोग्य, निरोगी जीवनाचा प्रचार सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क आणि डेटा सेंटर  पर्यावरण आणि हवामान बदल पायाभूत सुविधा तंत्रज्ञान प्रकल्प ऊर्जा लेखापरीक्षण  कृषी उत्पादन मूल्य साखळी तंत्रज्ञानाची क्षेत्रे परवडणारी घरे  महिला उद्योजकता 

डिजिटल विद्यापीठस्टार्टअप नॉलेज सेंटर अंतर्गत विना नफा तत्त्वावर देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ सुरू करत आहोत. त्यात महात्मा फुले महामंडळ व महाप्रितच्या लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था असेल. सर्वांना कोणत्याही अभ्यासक्रमासाठी १० हजारांच्या आत शिक्षणशुल्क असेल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण मिळेल.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटर