प्रदूषण कमी करण्यासाठी 'इलेक्ट्रिक वाहन', आदित्य ठाकरेंनी चालवली कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 04:20 PM2021-10-02T16:20:06+5:302021-10-02T16:20:41+5:30

यावेळी बोलताना मंत्री ठाकरे म्हणाले, मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे.

Electric vehicle driven by Aditya Thackeray to reduce pollution in mumbai car rally | प्रदूषण कमी करण्यासाठी 'इलेक्ट्रिक वाहन', आदित्य ठाकरेंनी चालवली कार

प्रदूषण कमी करण्यासाठी 'इलेक्ट्रिक वाहन', आदित्य ठाकरेंनी चालवली कार

Next
ठळक मुद्देसर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई - मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.

यावेळी बोलताना मंत्री ठाकरे म्हणाले, मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटा, टेस्ला, वोल्वो, ऑडी, जग्वार, मर्सिडीज, एमजी, ह्युंडाई अशा विविध कंपन्यांची सुमारे 30 वाहने सहभागी झाली होती. अदानी इलेक्ट्रिसिटी या रॅलीचे प्रायोजक होते. यावेळी ऑटोकारचे प्रमुख सोराबजी, अदानी इलेक्ट्रिसिटीचे जी.अदानी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

Read in English

Web Title: Electric vehicle driven by Aditya Thackeray to reduce pollution in mumbai car rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.