Join us

पालिका अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेने आता अधिकाऱ्यांसाठीही इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेने आता अधिकाऱ्यांसाठीही इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी मुंबईत काही ठिकाणी चार्जिंग पॉईंटही सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ १५ ऑगस्टपासून करण्याचा पालिकेचा मानस आहे.

मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने यापूर्वीच इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता महापालिकेने प्रदूषणमुक्त मुंबईसाठी इलेक्ट्रिक गाड्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विविध समितीचे अध्यक्ष, गटनेते, अधिकारी यांना त्यांच्या कार्यकाळात महापालिकेमार्फत शासकीय वाहन दिले जाते. अशी सुमारे दोनशे वाहने घेण्यात येतात. तसेच माल वाहतुकीसाठी हलकी व अवजड मालवाहक वाहनेही वापरली जातात. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी आता ही पारंपरिक इंधनाची वाहने कमी करून इलेक्ट्रिक प्रकारची वाहने टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

* महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विविध समितीचे अध्यक्ष, गटनेते, अधिकारी आदींसाठी एकूण दोनशे वाहने घ्यावी लागतात.

* मार्च महिन्यात ३० ते ४० प्रवासी वाहने तर २५ ते ३० हलकी मालवाहक वाहने विकत घेण्यात येणार आहेत.