इलेक्ट्रिशियन निघाला बांगलादेशी नागरिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:45 IST2025-01-03T14:44:56+5:302025-01-03T14:45:46+5:30
नोयन तोकीबोर शेख (वय २४) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे निवडणूक आयोगाचे बनावट मतदार ओळखपत्र सापडले आहे.

इलेक्ट्रिशियन निघाला बांगलादेशी नागरिक
मुंबई : इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. नोयन तोकीबोर शेख (वय २४) असे त्याचे नाव असून त्याच्याकडे निवडणूक आयोगाचे बनावट मतदार ओळखपत्र सापडले आहे.
एटीसी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक धनंजय व्यवहारे आणि पथकाने बुधवारी रे रोड परिसरात एका संशयिताला हटकले. चौकशीत तो बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले. त्याने बनावट कागदपत्रांद्वारे अवैध मार्गाने भारतात प्रवेश केला आहे. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे, निवडणूक आयोगाचे बनावट मतदार ओळखपत्र मिळाले. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंधेरी पश्चिमेत एकास अटक
अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात राहणारा बांगलादेशी नागरिक संतो शेख (२४) याला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेशचा कोड नंबर असलेले अनेक मोबाइल क्रमांक त्याच्या मोबाइलमध्ये सापडले आहेत. तसेच चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले आहे.
त्याच्याविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम कलम १४ सह संबंधित कलमांतर्गत बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.