सादील अनुदानातून वीज बिल अदा करता येणार, शिक्षण विभागाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:20 AM2020-12-04T04:20:13+5:302020-12-04T04:20:13+5:30

मुंबई : राज्यातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांतील १०,६७१ शाळांची तब्बल ५८८.६३ लाख इतकी ...

Electricity bill can be paid from simple grant, approval of education department | सादील अनुदानातून वीज बिल अदा करता येणार, शिक्षण विभागाची मान्यता

सादील अनुदानातून वीज बिल अदा करता येणार, शिक्षण विभागाची मान्यता

Next

मुंबई : राज्यातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांतील १०,६७१ शाळांची तब्बल ५८८.६३ लाख इतकी कायमस्वरूपी बंद वीज देयकांची रक्कम थकीत असून, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस ती देणे बाकी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने ही थकीत रक्कम या एका वर्षापुरती विशेष बाब म्हणून सादील अनुदानातून देण्यास परवानगी दिली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालवलेल्या प्राथमिक शाळांसाठी भौतिक, शैक्षणिक व दैनंदिन सुविधांचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षीच्या वेतन खर्चाच्या ४ टक्के सादिलावर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच शाळांतील वीज बिल (१००० रु. प्रतिमहिना मर्यादेत) इतर निधीतून वीज बिल भरले नसल्यास सादील अनुदानातून भागविण्यासाठी विभागाने याआधीच मान्यता दिली आहे.

............................

Web Title: Electricity bill can be paid from simple grant, approval of education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.