ग्रीन व ऑरेंज झोनमधील वीज बिल भरणा केंद्र खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 02:26 PM2020-05-12T14:26:23+5:302020-05-12T14:27:00+5:30
काही वीज बिल भरणा केंद्र ११ मे पासून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
मुंबई : महावितरणच्या भांडुप परिमंडलातील पेण व वाशी मंडळ अंतर्गत काही भाग ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये आले असून यातील काही वीज बिल भरणा केंद्र ११ मे पासून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यात लोकडाऊन लागू करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गर्दी टाळण्यासाठी, महावितरणचे वीज बिल भरणा केंद्रही तात्पुरते बंद केले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी रायगड व आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांनी जाहीर केलेल्या कोरोना बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वीज बिल भरणा केंद्र सुरु करण्यास प्रतिबंध आहे. तसेच, वीज देयक स्वीकारताना शारीरिक अंतर राखणे, मास्क परिधान करणे, केंद्राबाहेर मार्किंग करणे, हॅन्ड वॉश करणे इत्यादी सुविधा कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महावितरण भांडुप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी या वीज बिल भरणा केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दोन्ही मंडलांना दिले असून जास्तीतजास्त ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.
--------------------------------
खुले वीज बिल भरणा केंद्र
उरण ८
अलिबाग ९
पेण ७
गोरेगाव २
महाड ७
म्हसाळा ६
पोलादपूर ५
श्रीवर्धन २
कर्जत २
खालापूर १
खोपोली १
पनवेल ३
माणगाव ४
मुरुड २
पाली ३
रोहा ३
तळा २
एकूण ६७