वीज बिल भरण्याचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:08+5:302021-07-10T04:06:08+5:30
९९ टक्के तक्रारींचे ही समाधानकारक निरसन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वीज बिल भरण्याचे प्रमाण वाढले ...
९९ टक्के तक्रारींचे ही समाधानकारक निरसन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वीज बिल भरण्याचे प्रमाण वाढले असून, १ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ दरम्यान ८,३४७ कोटी महसूल जमा झाला आहे. तो मागील वर्षाच्या तुलनेत २,३७३ कोटी इतका जास्त आहे. तर राज्यातील सुमारे २.५० कोटी घरगुती ग्राहकांपैकी ६ लाख ९४ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९९ टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आले.
महावितरण सुद्धा महापारेषण व वीज निर्मिती कंपनीचे ग्राहक आहेत. वीज निर्मिती कंपन्यांना लागणारा कोळसा व तेल खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम द्यावी लागते. दुसरीकडे सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून शासकीय वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण, परवाना मुक्त करण्याचे धोरण आहे. महावितरणची थकबाकी जर वाढत राहिली तर ते महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, जे ग्राहक लॉकडाऊन नंतर आलेले बील एक रक्कमी भरतील त्यांना एकूण वीज बिलात २ टक्के रक्कम माफ करण्याची अतिरिक्त सवलत यापूर्वी देण्यात आली होती.