मुंबई : कृषिपंपांची थकबाकी असणाºया शेतकºयांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ लागू करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतक-यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीजबिले देण्यात येत असून, त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यांत भरावयाची, याची माहिती देण्यात आली आहे. योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकºयांच्या वीजबिलात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या बिलात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. बिलाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी शेतकºयांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे, तसेच डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८पर्यंत ५ हप्त्यांत किती रक्कम भरावी लागणार आहे, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. थकबाकीचे हप्ते नियमित भरणाºया शेतकºयांना नेमका किती रुपयाचा दंड आणि व्याज माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल? याचाही आकडा नमूद करण्यात आला आहे.
थकबाकीदार शेतक-यांना वीजबिले नव्या स्वरूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 2:43 AM