वीजबिल वाढले; तुम्ही कपडे इस्त्री कोठे करता?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:26 PM2023-07-31T15:26:29+5:302023-07-31T15:26:58+5:30

एवढे सगळे होत असताना पगार मात्र वाढत नाहीत. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी आता घरच्या घरी कपड्यांना इस्त्री करण्यावर भर दिला आहे.

Electricity bills increased; Where do you iron your clothes | वीजबिल वाढले; तुम्ही कपडे इस्त्री कोठे करता?

वीजबिल वाढले; तुम्ही कपडे इस्त्री कोठे करता?

googlenewsNext

मुंबई : इंधनाचे दर सातत्याने वाढत असून, आता मुंबईकरांचा टोमॅटोने जीव काढला आहे. हे कमी म्हणून की काय वाढते वीज बिल मुंबईकरांना घाम फोडत आहे. याला जोड म्हणून लाँड्री चालकांना व्यावसायिक दर लागू होत असल्याने त्यांनी इस्त्रीचे दर वाढविले आहेत. एवढे सगळे होत असताना पगार मात्र वाढत नाहीत. त्यामुळे अनेक मुंबईकरांनी आता घरच्या घरी कपड्यांना इस्त्री करण्यावर भर दिला आहे.

लाँड्री चालकांच्या समस्या अनेक
-  कामगारांचे पगार वाढले आहेत. ते देणे परवडत नाहीत.
-  कामगार मिळत नाहीत. त्यामुळे आहे त्या कामगाराला जपावे लागते.
-  इस्त्री करताना एखादे कापड जळाले तर ते भरून द्यावे लागते.
-  दुकानाचे भाडे अव्वाच्या सव्वा असल्याने भाडे भरताना नाकी नऊ येतात.
-  कपड्यांना नीट इस्त्री नाही झाली तर ग्राहकांचा रोष पत्करावा लागतो.

वीजदर वाढले
दरवर्षाने विजेचे बिल वाढते. त्यामुळे इस्त्रीचे दर वाढवावे लागतात. कामगारांचा पगार आहे. कामगार मिळत नाहीत. ग्राहकही जपावे लागतात. दुकानाची छोटी मोठी कामे असतात. अधूनमधून काही ना काही खर्च निघत असतो. सगळे सांभाळावे लागते. त्यामुळे दर वाढविण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.

कामगार कसे मिळणार? -
इस्त्री करणारे बहुतांशी कामगार हे उत्तर भारतातील आहेत. हे कामगार एकदा सुट्टीवर गेले की महिनाभर येत नाहीत. अशावेळी दुसरा कामगार मिळत नाही. त्यामुळे या कामगारांना जपण्यातच मालकाचा जीव जातो.

विजेचे दर वाढलेत...
जेव्हा दर कमी होते; तेव्हा रोज कपडे इस्त्रीसाठी दिले जात होते. आता परवडत नाही. विजेचे दर वाढले म्हणून इस्त्रीचे दर वाढले. हे कारण इस्त्रीवाल्याचे बरोबर आहे. पण पगार तुलनेने वाढला नाही. बाकीचे पण खर्च आहेत. सगळ्यांचा ताळमेळ साधावा लागतो.
 - राकेश पाटील

एक तर पगार वाढत नाही. मुलांच्या शाळेच्या गणवेशाला नाही म्हटले तरी इस्त्री करावी लागते. ऑफिसच्या शर्ट आणि पँटला इस्त्री करावी लागते. लोकलमध्ये धक्के खाताना ऑफिस गाठेपर्यंत इस्त्री उतरलेली असते.
- विनोद घोलप
 

Web Title: Electricity bills increased; Where do you iron your clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज