Join us

वीजबिले उशिरा; ग्राहकांना १० रु.चा फटका

By admin | Published: May 23, 2014 3:48 AM

एका बिलावर दहा रूपये जास्तीचे असे लाखो रूपये महावितरणला सहज मिळत आहेत

खडवली : महावितरण चा कारभार दिवसंदिवस ढिसाळ होत असून दरमहिन्याला ग्राहकांना दिली जाणारी वीज देयकं तारीख निघून गेल्या नंतर मिळत असल्याने नाहक ग्रामीण ग्राहकांना १० रू जास्तीचा भुर्दंड येथे सोसावा लागत आहे. एका बिलावर दहा रूपये जास्तीचे असे लाखो रूपये महावितरणला सहज मिळत आहेत. यामुळे वीज ग्राहक संतप्त झाले आहेत ़ कल्याण उपविभागअंतर्गत येणार्‍या राया, खडवली, नडगाव, वावेघर, निंबवली, मोस, हाल, उशिद, उतने, चिंचवली अशा भागात वीज देयकं वाटतांना मोठा हलगर्जीपणा होत आहे. महावितरण ने दिलेल्या विज बिलापेक्षा दहा रूपये अधिक भरण्याची वेळ येथे वीज ग्राहकांवर आली आहे. महावितरण ने यावेळी माहे एप्रिल चे वीज बिल दिले ते भरण्याची तारीख ८ मे होती. पण बिल मिळाले १३ मे रोजी त्यामुळे यातारखे नंतर बिल भरल्यास १० रू जास्तीचे ग्राहकाला भरावे लागत आहेत. एका बिलावर १० या प्रमाणे जवळपास सहा हजाराच्या वर विज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून किती रक्कम महावितरणला जास्तीची प्राप्त होत असेल याचा विचार होणे गरजेचे आहे. या संदर्भात खडवली शाखा अभियंता टी. जे. घोडविंदे यांना विचारले असता बिल वाटप करणार्‍यांना वेळेवर बिल देण्याच्या सूचना दिल्याचे सांगत परत एकदा त्यांना समज देतो असे सांगितले.